शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा, प्राधिकरण कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:22 IST

मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून तब्बल १०० कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब विधी मंडळातील लक्षवेधी पुढे आल्यानंतर या प्रकरणात जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

ठळक मुद्देपेयजल योजनेचा निधी अखर्चित ठेवणे भोवले

नांदेड : मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून तब्बल १०० कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब विधी मंडळातील लक्षवेधी पुढे आल्यानंतर या प्रकरणात जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब आ. अमरनाथ राजूरकर यांनी विधी मंडळात लक्षवेधीमध्ये मांडली. विधी मंडळाच्या नियम १०१ अंतर्गत लक्षवेधी मांडताना आ. राजूरकर यांनी जिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल अंतर्गत दोन वर्षापासून जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. एकीकडे जिल्ह्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असताना निधी मात्र खर्च केला जात नाही. ही बाब गंभीर असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायतीकडून ठराव दिल्यानंतरही टँकर तसेच अन्य पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव वेगवेगळ्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवावे लागत आहेत. त्यामुळे हे अधिकार तहसीलदारस्तरावर द्यावेत, अशी मागणीही आ. राजूरकर यांनी विधान परिषदेत केली. याबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या मागणीला भाई जगताप, सुरेश धस, विक्रम काळे, सतीष चव्हाण, रामहरी रुपनवर व विनायक मेटे यांनी पाठींबा दिला.या प्रश्नावर उत्तर देताना जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे सांगताना पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी टँकर व अन्य पाणी पुरवठा योजना मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले असल्याचे सांगितले. या प्रकरणातील जीवन प्राधिकरण आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.पाणीपुरवठ्यासंबंधीचे अधिकार तहसिलदारांनाजिल्ह्यातील ज्या शेतक-यांच्या विहिरी व बोअरवेल पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित केले आहेत त्यांना अनेक महिने पैसे मिळत नाहीत. दोन महिने शासनाने या यंत्रणेचा वापर केल्यानंतर एकाच महिन्याचे पैसे दिले जातात. ही बाब गंभीर असल्याचे आ. राजूरकर यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना तात्काळ पैसे देण्याचे मंत्र्यांनी मान्य केले. नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये दिरंगाई करणा-या अधिका-यांवर कारवाईसह पिण्याच्या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान करण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडGovernmentसरकारBabanrao Looneykarबबनराव लोणीकर