शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, औषधांचा मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:24 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, औषधांची कमतरता, निधीच्या खर्चासह कोलमडलेल्या नियोजनांच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती बैठक : सादर केलेल्या कागदपत्रांमधील गोंधळ उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, औषधांची कमतरता, निधीच्या खर्चासह कोलमडलेल्या नियोजनांच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आले आहे.जि.प. अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य पूनम पवार यांनी गडगा येथील अर्धवट पाणीपुरवठा योजना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे, रेबिज इंजेक्शनचा पुरवठा करणे, पंचायत समिती विभागाच्या वतीने कागदपत्रांमध्ये होत असलेला गोंधळ आदी मुद्दे उपस्थित केले. तसेच गडगा येथील पाणीपुरवठा योजना मागील काही वर्षांपासून अर्धवट राहिली असल्याने येथील नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. दरम्यान, एक कोटी रूपयांची ही योजना असून सदर कामावर आतापर्यंत ६५ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर उर्वरीत ३५ लाख रूपये ३१ मार्चपर्यंत खर्च करून सदरची योजना पूर्ण करण्याच्या सूचना जि.प. सदस्या पवार यांनी यावेळी दिल्या.त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर रेबिजच्या इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा दावा जि. प. च्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या वतीने केला गेला. परंतु, सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना रेबिजचे इंजेक्शन घेण्यासाठी खाजगी रूग्णालयात जावे लागत असल्याचे सांगत यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली.तसेच राष्टÑीय पेजयल योजनेंतर्गत पंचायत समितींना ५० हजार रूपयांचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्याचा अधिकार आहे. परंतु, संपूर्ण योजना या जवळपास एक करोड रूपयांच्या असल्यामुळे पंचायत समितीच्या वतीने दाखल करण्यात आलेले प्रस्तावांचा काही उपयोग राहत नसल्याची माहिती पवार यांनी दिली. दरम्यान, जि. प. सदस्य बेळगे यांनी दलित वस्ती योजनेच्या निधीचे नियोजन करण्याची मागणी केली. परंतु, समाजकल्याण अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याने या मुद्यावर चर्चा होऊ शकली नाही.तसेच बैठकीत दक्षिण व उत्तर विभागाच्या वतीने करण्यात येणाºया कामांची विभागाच्या वतीने आढावा घेणे व शाळांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे, या मुद्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीस जि. प. चे उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सभापती माधव मिसाळे, दत्तात्रय रेड्डी, शीला निखाते, मधुमती कुटूंरकर, जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, अ‍ॅड. विजय धोंडगे, सुशीला बेटमोगरेकर आदींची उपस्थिती होती.