शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तसाठी जिल्ह्याला सव्वाचार कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:31 IST

शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्रालयाने १६ मार्च रोजी शासन अध्यादेश काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्रालयाने १६ मार्च रोजी शासन अध्यादेश काढला आहे.जिल्ह्यात २०१५ पासून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मागील तीन वर्षांत या योजनेतून झालेल्या कामांमुळे पाणीपातळीत वाढ झाली असून वैयक्तिक शेततळी, पाझर तलाव आदींकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.यासाठी गावकºयांचा सामूहिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावातील कामे झपाट्याने झाली. दरम्यान, काही दिवसांपासून निधीअभावी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरु केलेली कामे रखडली होती.आता ही कामे करण्यासाठी शासनाने २०१७-१८ मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी ४.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी वित्त विभागाने जिल्हाधिकारी यांना वितरित केला आहे. ४.२४ कोटींपैकी २.०७ कोटी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी तर २.१७ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानाकरिता देण्यात आले आहेत.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत नियोजित केलेली कामे करुन उरलेला निधी जलयुक्त शिवारसाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या गावांतील कामांसाठी हा निधी वापरला जाईल. या योजनेतील कामांसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त तर जिल्हाधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.दरम्यान, निवड झालेल्या गावांतील नदी खोलीकरण, तलाव आदी कामे पावसाळा सुरु होण्याअगोदर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.