शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांवरील जलसंकट तूर्त टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:17 IST

महापालिकेच्या उच्च दाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये वीजबिल थकल्याने महावितरणने वीज तोडण्याची कारवाई केली़ त्यामुळे गुरूवार आणि शुक्रवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होवू शकला नाही़ दरम्यान, ११ कोटींपैकी ९४ लाख रूपयांचा धनादेश महावितरणला दिल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ त्यामुळे तूर्तासतरी नांदेडकरांवरील जलसंकट टळले आहे़

ठळक मुद्देवीजपुरवठा सुरळीत : मनपाने दिले वीजबिलापोटी ९४ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या उच्च दाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये वीजबिल थकल्याने महावितरणने वीज तोडण्याची कारवाई केली़ त्यामुळे गुरूवार आणि शुक्रवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होवू शकला नाही़ दरम्यान, ११ कोटींपैकी ९४ लाख रूपयांचा धनादेश महावितरणला दिल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ त्यामुळे तूर्तासतरी नांदेडकरांवरील जलसंकट टळले आहे़नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा करणाºया उच्चदाब ग्राहकांकडे ११ कोटी रूपये तर लघुदाब ग्राहकांकडे १४ कोटी असे एकूण २५ कोटी रूपये वीजबिल थकले आहे़ दरम्यान, महावितरणकडे विविध करापोटी महापालिकेचे सहा कोटी रूपये येणे शिल्लक आहे़ दरम्यान, महावितरणकडून दिल्या गेलेले बिल आणि दंडाची रक्कम महापालिका अधिकाºयांना मान्य नाही तर महावितरणच्या विविध मालमत्तांच्या करापोटी महापालिकेला देय असलेली रक्कम महावितरणला मान्य नाही़ त्यामुळे थकित वीजबिल आणि कर यात ताळमेळ बसलेला नाही़ आजपर्यंत यावर तोडगा न निघाल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली़ गुरूवारी सायंकाळी दक्षिण नांदेड तर शुक्रवारी सकाळी उत्तर नांदेड भागातील महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची वीज तोडल्यामुळे शहरावर जलसंकट ओढवले़ दोन्ही यंत्रणांकडून थकित बिल, करापोटी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत़ परंतु, नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ दरम्यान, महापालिकेने कारवाई थांबविण्यासाठी महावितरणला जवळपास ९४ लाख रूपयांचा धनादेश दिला आहे़ त्यामुळे उच्चदाब ग्राहकांचा खंडित केलेला वीजपुरवठा २४ तासांनी सुरळीत करण्यात आला आहे़ परंतु, येणाºया काळात उर्वरित २४ कोटी थकित वीजबिल न मिळाल्यास पुन्हा महापालिकेचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून केव्हाही होवू शकते़