शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

अनुदानित बियाणांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

नांदेड : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, अतिशय मोजक्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळत ...

नांदेड : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, अतिशय मोजक्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळत असल्याने सदर योजना असून अडचण नसून खोळंबा, अशीच म्हणावी लागेल. जवळपास ५६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून साडेतीन हजार शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले असून जवळपास साडेआठ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. परंतु, गतवर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा अनुदानित बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली आहे. अनुदानित बियाणे अत्यल्प दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. परंतु, ते सर्वांनाच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. आजघडीला नांदेड जिल्ह्यात ५६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे खरेदीसाठी नोंदणी केली आहे. परंतु, शुक्रवारी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये केवळ ३ हजार ७०० जणांचीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ५० हजारावर शेतकऱ्यांना बियाणे मिळणार की नाही, असा प्रश्न नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात ५६ हजार अर्ज

नांदेड जिल्ह्यात अनुदानित बियाणे खरेदी करण्यासाठी ५६ हजार ३५८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९ हजार ६५० अर्ज मुखेड तालुक्यातून आहेत. त्याचबरोबर अर्धापूर तालुक्यातून ७०६, भोकर - ३०४६, बिलोली - ३०८८, देगलूर - ५५८९, धर्माबाद - १४५३, हदगाव - ६२१८, हिमायतनगर - १५९८, कंधार - ४०७०, किनवट - ३६८६, लोहा - ५१३२, माहुर - २९९४, मुदखेड - ८६५, नायगाव - ५५१९, नांदेड - ११०४, तर उमरी तालुक्यातून ८७४ अर्ज आले आहेत.

निवड झालेल्यांना येणार एसएमएस

नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावे म्हणून नोंदणी केली आहे. परंतु, प्रत्येक शेतकऱ्यास हे बियाणे मिळणार नसून केवळ लॉटरी पद्धतीने नावे निघालेल्या शेतकऱ्यांनाच बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद आणि तुरीचेच बियाणे उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सर्वाधिक सोयाबीन बियाणास मागणी आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एसएमस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना महाबीजचे बियाणे खरेदी करता येणार आहे. जवळपास १२०० रुपये प्रति क्विंटल या दराने सदर बियाणे मिळणार आहे. एसएमएस आला तरच आपली लॉटरी लागली, असे शेतकऱ्यांनी समजावे.

सोयाबीनसाठी सर्वाधिक अर्ज

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून अत्यल्प दराने अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, शेतकऱ्यांची निवड खूप कमी केली जात असल्याने बहुतांश गावांत अनुदानित बियाणे एकाही शेतकऱ्यास मिळत नाही, असेही चित्र आहे. कडधान्य, गळीतधान्य आणि पौष्टिक तृणधान्याची बियाणे उपलब्ध करून दिली जात आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यात पुढील आठ दिवसात सोयाबीन, उडीद आणि तुरीचे बियाणे देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित बियाणे मिळावे म्हणून अर्ज केला आहे. परंतु, अद्याप तरी कोणताही एसएमएस आलेला नाही. या ठिकाणी ओळखीने अथवा राजकीय नेत्यांच्या शिफारशीचे बियाणे दिले जाते. त्यामुळे आम्हाला बियाणे उपलब्ध होईल की नाही, अशी शंका आहे.

- तुकाराम सूर्यवंशी, शेतकरी.

मागील चार वर्षांपासून नियमितपणे अर्ज करून नोंदणी करतो. परंतु, आजपर्यंत अनुदानित बियाणे मिळाले नाही. खासगी व्यापाऱ्यांकडून घेतलेले बियाणे बोगस निघाल्याने शासनाच्या महाबीजचे बियाणे खरेदी करण्याचा विचार आहेत. परंतु, लॉटरीमध्ये नाव लागले तरच. अन्यथा घरगुती बियाणांची पेरणी करून पीक घ्यावे लागणार आहे.

- पुरभाजी कदम, शेतकरी.