शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

नांदेडमध्ये शिवशाहीची प्रतीक्षा संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:08 IST

नांदेड: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाच्या वतीने वातानुकूलीत शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. नांदेड विभागाला ३० शिवशाही बसेस मंजूर होवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला़ नजीकच्या लातूर विभागात शिवशाही बसेस पोहोचल्या आहेत. परंतु नांदेडची प्रतीक्षा संपलेली नाही़

ठळक मुद्देलातूरला पोहोचल्या : नांदेडकर मात्र तीन महिन्यांपासून वेटींगवर

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाच्या वतीने वातानुकूलीत शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. नांदेड विभागाला ३० शिवशाही बसेस मंजूर होवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला़ नजीकच्या लातूर विभागात शिवशाही बसेस पोहोचल्या आहेत. परंतु नांदेडची प्रतीक्षा संपलेली नाही़दिवसेंदिवस घटणारे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. परंतु कोणतीही योजना दीर्घकाळ टिकत नसल्याने योजनांवर होणाºया खर्चाने एसटी पुन्हा तोट्यात धावत आहे़ प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाने सुरु केलेली ‘वायफाय’ सुविधादेखील अल्पावधीतच बंद पडली़ तसेच अनेक महिन्यांपासून नांदेड विभागाला शिवशाही बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदेडातून पुणे, नागपूर, कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणी विविध ट्रॅव्हल्स धावतात. रेल्वे आणि बस हा पर्याय उपलब्ध झाल्यास खासगी ट्रॅव्हल्सच्या उत्पन्नात घट होईल. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालक अधिकाºयांशी साटेलोटे करुन पुण्यासाठी रेल्वे अथवा वातानुकूलीत बसेस सोडल्या जात नसल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.देखभाल : दुरूस्तीचा प्रश्न उद्भवू शकतो४दरम्यान, यापूर्वी शहर बससेवेसाठी ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत टाटा कंपनीच्या १५ बसेस मिळाल्या होत्या, परंतु नांदेड विभागात टाटा कंपनीच्या अत्याधुनिक बसेसच्या देखभालीची व्यवस्था नसल्याने सदर बसेस दुरुस्तीअभावी बंद आहेत. शिवशाही बसेसमध्ये देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. टाटा कंपनीच्या असलेल्या या बसेसची नांदेड विभागात नियमित देखभाल दुरुस्ती होऊ शकेल की नाही, यावरही यांत्रिक विभागाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे़