शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

किनवटकरांना उमेदवारांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:50 IST

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेस कोणाला मैदानात उतरविते.

किनवट : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेस कोणाला मैदानात उतरविते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच हिंगोली लोकसभेत यंदा चुरशीचा तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.किनवटचा मतदार हा जागरूक आहे. हे आजपर्यंतच्या निवडणुकीवरून दिसून आले आहे़ किनवट नगरपरिषद व पंचायत समितीची सत्ता भाजपकडे आहे. तर माहूर नगरपरिषद व एकूण आठ जि़प़पैकी सहा सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. त्यात नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव हे याच माहूर तालुक्यातील आहेत़ लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन येत्या विधानसभेचे गणित बांधले जाणार असल्याने आ़ प्रदीप नाईक प्रचारात चांगलेच सक्रिय होतील. दुसरीकडे सेना- भाजपाही आपली ताकद आजमावणार असून, वंचित बहुजन आघाडीनेही चांगलीच कंबर कसल्याचे चित्र आहे़ मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने असणाऱ्या माजी आ़ भीमराव केराम यांची भूमिका या लोकसभा निवडणुकीत काय असणार यावरही बरेच काही अवलंबून आहे़ भाजप- सेनेत असलेली गटबाजी लोकसभा निवडणुकीत राहील की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल़

  1. हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून १ लाख ३२ हजार ९४५ पुरुष व १ लाख २४ हजार ५९१ स्त्री व इतर ०८ असे एकूण २ लाख ५७ हजार ५४४ मतदार आहेत़ मोदी लाटेच्या विरोधात ज्या दोन जागा जिंकल्या त्यात नांदेड आणि हिंगोलीचा समावेश होता. मागील निवडणुकीत विद्यमान खा़अ‍ॅड़राजीव सातव यांना किनवटमधून आ़प्रदीप नाईक व आदिवासी नेते माजी आ़भीमराव केराम यांनी चांगले सहकार्य केल्याने ते विजयी झाले होते. आपल्या मतदारसंघाचा खासदारास लागोपाठ उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून बहुमान मिळतो. याचा अभिमान मतदारांत दिसून येतो. गावचौकातल्या बैठकीतही याबाबतची चर्चा होताना दिसते. मात्र, अद्यापपर्यंतही काँग्रेस आघाडी व युतीचा उमेदवार स्पष्ट झालेला नसल्याने कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत तर मतदार संभ्रमात आहे़
टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक