यापूर्वी आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतील ७० टक्के रुग्णांचा समावेश होता, तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होती. आता मात्र नेमके उलट झाले आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असून, ग्रामीण भागात ती वाढली आहे. दररोज प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात तपासण्या वाढविण्यात येणार आहेत. ज्या गावात जास्त रुग्ण आढळतील ती गावे सील करण्यात येणार आहेत. शिवाय गावातच शाळा, समाजमंदिर, महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करून उपचार देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी तपासणीसाठी डॉक्टरांची टीम असणार आहे. रुग्ण गंभीर झाला, तर पुढील उपचारासाठी शहरात हलवण्यासाठी रुग्णवाहिकेचीदेखील सुविधा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितले.
तपासणी करून गावे करणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST