शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजी-भाकरी पंगतीची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:35 IST

तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे.

ठळक मुद्देतामशाचे बारालिंग मंदिर : पंगतीला १२५ वर्षांची परंपरा

हदगाव : तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे.येथील बारालिंग मंदिराची भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार असून यानिमित्ताने येथे प्रसादासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा या भागांतून हजारो भाविक हजेरी दरवर्षी लावतात. सव्वाशे वर्षांची परंपरा जपण्यासाठी तामशासह पंचक्रोशीतून शेकडो हात झटत आहेत. येथे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी (करदिनी) भाजी-भाकरीची पंगत होते. येथे भाकरी आणल्या जातात. खाण्यायोग्य फळे, भाज्या, फुले यांची आयुर्वेदिक भाजी मंदिर परिसरात शिजविली जाते. सव्वाशे वर्षांपूर्वी तामसा खेड्यासाठी असलेली पंगत आता मात्र ग्लोबल झाली आहे. येथे यानिमित्तमाने ग्रामीण जीवनाचे, संस्कृतीचे सुंदर चित्रण पहावयास मिळते. ग्रामीण भागातील मुख्य खाद्य असणारी भाकरी व भाजी यावरील प्रेम वाढविणारी ही पंगत ग्रामीण सांस्कृतिक अस्मिता जोपासत असते. येथील बारालिंगाचे शिवालय प्राचीन हेमाडपंती आहे. मुख्य पिंड ही जमिनीपासून भूगर्भात अंदाजे दहा फूट खोल आहे. मंदिरात उजव्या बाजूला बारा पिंडी आहेत. यामुळेच येथे बारालिंग नाव प्रचलित असावे. येथे जाण्यासाठी वाहनासाठी रस्ता असून जुन्या गावातील नागरिक नदी ओलांडून येतात. तसेच या भागातील अनेक गावांतून भाकरी बनवून पोहोचविल्या जातात.ज्वारीच्या भाकरीची व भाज्यांची गोडी व चव याचा आस्वाद घेताना समाधान व्यक्त करतात. येथे दर्शन व प्रसादासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे; पण शांततेची, सुव्यवस्थेची परंपरागत अबाधित आहे. पंगत यशस्वीतेसाठी बारालिंग देवस्थान समिती व नियोजन समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. यामध्ये पंगतीच्या वेळी प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळण्यासाठीचे नियोजन ठरले. महिला- पुरुष भाविकांसाठी प्रसादाची स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. येथे येणारा भाविक हा प्रसादाविना राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

  • पंगत यशस्वी करण्यासाठी पोलीस, वीज वितरण यंत्रणा प्रयत्न करीत असून येथे एक दिवसासाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक उपलब्ध राहणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी सांगितले. पंगतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन मंदिराचे पुजारी रेवणासिद्ध महाराज कंठाळे, संस्थानचे अध्यक्ष संतोष निल्लावार, कोषाध्यक्ष अनंता गोपाळे यांनी केले आहे.
टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम