शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहार समितीच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांचा १७ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. ढवळे म्हणाले की, वामनदादांच्या गीतांनी समग्र संघर्षाची प्रेरणा दिली. कार्यकर्त्यांना ‘तुफानातील दिवे’ अशी उपमा देऊन कोणत्याही संकटाला तोंड देण्याची सूर्यकुलीन ऊर्जा दिली. वामनदादांची असंख्य गाणी आजही मनावर गारुड करून आहेत. त्यांच्या तालमीत अनेक कवी, गायक, गीतकार, तसेच संगीतकार तयार झाले. आज दादांच्या कुटुंबासह नि:स्वार्थ भावनेने आंबेडकरी चळवळ गीतांच्या माध्यमातून पुढे नेणारे अनेक कवी, गायक कष्टप्रद जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे.
संयोजक सुभाष लोखंडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी गंगाधर शिराढोणकर, भीमराव सातोरे, राहुल दुधमल, अवंती कदम, राहुल कदम, हर्षदीप लोखंडे, संकेत गायकवाड, विनोद कापुरे, सोनू गोडबोले, अनिकेत कापुरे, अभिषेक थोरात, उत्तम नवघडे आदी उपस्थित होते.