शेवटच्या बैठकीला नॅक समितीचे अध्यक्ष डॉ. गोपालकुमार क्षेत्री, समन्वयक डॉ. गौरीश नाईक, सदस्य डॉ. लक्ष्मी सरकार, सदस्य डॉ. नागेश्वरराव, सदस्य डॉ. गुलशन बसंल, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे आणि नॅक समन्वयक डॉ. डी.डी. पवार यांची उपस्थिती होती.
गेली पाच वर्षांत विद्यापीठाने काय विकास साधला याचे बारकाईने मूल्यांकन करण्यासाठी नॅक समिती आलेली होती. कोविड-१९ सारख्या महामारीतून जिल्हा जात असताना देखील सर्व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोतोपरी माहिती या समितीसमोर सादर केली. समितीनेही प्रत्येक बाब बारकाईने पाहिली. विद्यापीठातील प्रत्येक विभागासह काही संकुलास त्यांनी भेट दिली. प्रत्येक घटकांशी चर्चा केली. चर्चेद्वारे त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. विद्यापीठावर असलेल्या सर्व प्राधिकरणाची त्यांनी भेटी घेतल्या. विद्यापीठाने सादर केलेल्या सर्व बाबी त्यांनी पुराव्यांसहित तपासल्या विद्यार्थ्यांच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा केली. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भाव देशभर जाणवत असतानाही या नॅक पिअर समितीने नांदेडमध्ये येऊन तीन दिवस राहून विद्यापीठाचे पुनर्मूल्यांकन केल्याबदल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी समितीचे आभार मानले. नॅक पिअर समितीमधील अध्यक्ष डॉ. गोपाल कुमार यांनी विद्यापीठाने केलेल्या सहकार्याबदल आभार मानले.
या दरम्यान कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, नॅक समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच समित्यांनी कोविड-१९ नियमांचे पालन करून जबाबदाऱ्या पार पडल्या. चांगलीच श्रेणी मिळेल अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन तथा आभार प्रा. नीना गोगटे यांनी केले.