शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरात भूमिगत वीजवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:08 IST

नांदेड महापालिका क्षेत्रात ४८ कि.मी. अंतरावर उच्चदाब व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असून ४८ कि.मी. अंतरात या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी महापालिकेला ४८ लाख रुपये महावितरणकडून प्राप्त होणार आहेत.

ठळक मुद्देनागपूर सामंजस्य करारानुसार होणार काम

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड महापालिका क्षेत्रात ४८ कि.मी. अंतरावर उच्चदाब व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असून ४८ कि.मी. अंतरात या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी महापालिकेला ४८ लाख रुपये महावितरणकडून प्राप्त होणार आहेत.शहरात आयपीडीएस योजनेखाली उच्चदाब व लघुदाब भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी महावितरणने महापालिकेकडे प्रारंभी प्रकल्प १२२ कि.मी. अंतरात काम करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर हे अंतर ६२ कि.मी. आणि शेवटी ४८ कि.मी. अंतरावर निश्चित झाले. महापालिकेने प्रारंभी ६२ कि.मी.च्या कामासाठी महावितरणकडे ३३ कोटी रुपये अपेक्षित शुुल्क असल्याचे सांगितले होते. मात्र याबाबत राज्य शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यात रोड दुरुस्तीबाबत झालेल्या सामंजस्य करारानुसार काम करण्याचे निर्देश संपूर्ण महापालिकेला दिले आहे.त्या सामंजस्य करारानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.त्यामुळे नांदेडमध्येही आता नागपूर सामंजस्य करारानुसारच महावितरण शहरामध्ये ४८ कि.मी. अंतरात भूमिगत उच्च व लघूदाब वीज वाहिन्या टाकणार आहे. या कामासाठी महापालिकेने परवानगी दिली असून पर्यवेक्षणासाठी महापालिकेने प्रति किलोमीटर १ लाख रुपये दर आकारणी केली आहे. त्यानुसार महावितरण आता नांदेड महापालिकेला पर्यवेक्षणासाठी ४८ लाख रुपये देणार आहे.त्याचवेळी या भूमिगत वीज वाहिन्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्तीचे काम महावितरणच करुन देणार आहे. हे काम आता कधी सुरू होईल, याकडे लक्ष लागले आहे.---महावितरण करणार रस्ता दुरुस्तीचे कामशहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी महाविरणकडूृन ४८ कि.मी. अंतरात खोदकाम केले जाणार आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याचेही खोदकाम होणार असून आता पुन्हा एकदा रस्त्यांची दूरवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी महावितरणकडूनच दुरुस्तीचे काम करुन घेतले जाणार आहे. या कामाच्या दर्जा तपासणीचे कामही महावितरणकडूनच केले जाणार आहे. त्यामुळे नांदेड शहरात विकास कामांतर्गत झालेल्या रस्ते बांधणीच्या कामाला पुन्हा एकदा छेद बसणार आहे. भूमिगत वाहिनी टाकल्यानंतर दुरुस्तीचे कामे योग्यरित्या झाली तर चांगले आहे अन्यथा शहरातील रस्त्यांचे पुन्हा पहिले पाढे, अशीच परिस्थिती होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका