शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वसरणी येथून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

पैशाच्या हिशेबासाठी केली मारहाण भोकर तालुक्यातील सोनारी येथे बचत गटाच्या पैशाच्या हिशेबावरून झालेल्या वादानंतर एका जणाला बेदम मारहाण करण्यात ...

पैशाच्या हिशेबासाठी केली मारहाण

भोकर तालुक्यातील सोनारी येथे बचत गटाच्या पैशाच्या हिशेबावरून झालेल्या वादानंतर एका जणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना ३१ मार्च रोजी घडली. किशन राठोड असे जखमी युवकाचे नाव आहे. ते प्रकाश राठोड यांच्या घराजवळ थांबलेले असताना, आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी राठोड यांच्याशी वाद घालून जबर मारहाण केली. या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

शहरातील ढवळे कॉर्नर परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याने, एका चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. अंकुश माणिकराव शिंदे या चालकाला त्याच्या मित्रांनी चहा पिण्यासाठी ढवळे कॉर्नर परिसरात बोलाविले होते. त्यानंतर, शिंदे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शिंदे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अर्धापूर येथे जमिनीवरून वाद

अर्धापूर शहरात मदिना मशिदीजवळ असलेल्या प्लॉटच्या मालकीवरून एका मजुराला मारहाण करण्यात आली. ही घटना २ एप्रिल रोजी घडली. इम्रानखान जुबेरखान हे घराजवळ उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी सदरील प्लॉट आमच्या मालकीचा आहे, असे म्हणून इम्रानखान यांना मारहाण केली. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दारूची वाहतूक करताना पकडले

नांदेड ते लोहा रस्त्यावर नगरपालिकेजवळ अवैधपणे दारूची वाहतुक करताना दोघांना पोलिसांनी पकडले. ४ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी देशी आणि विदेशी अशी साडेतीन हजार रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रेयसीला प्रियकराने पेटविले

नांदेड : शहरातील सांगवी भागात प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला होता, परंतु प्रियकर तिला नकार देत होता. त्यामुळे प्रेयसीने पेटवून घेण्याची धमकी देत, अंगावर पेट्रोल ओतले. तोच प्रियकराने तिच्या अंगावर जाळ लागलेली काडी फेकली. या घटनेत प्रेयसी भाजली गेली आहे.

कृष्णा ड्रायव्हिंग स्कूलच्या पाठीमागे किरायाच्या खोलीत राहत असलेल्या एका २२ वर्षीय महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळाले होते. सदर महिलेने तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला होता, परंतु प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याची धमकी दिली. यावेळी प्रियकराने तू कशाला जाळून घेतोस, मीच तुला पेटवितो, असे म्हणून प्रेयसीच्या अंगावर आगपेटीची काडी फेकली. या घटनेत प्रेयसी गंभीररीत्या भाजल्या गेली आहे. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात प्रियकराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.