अन्य एका घटनेत समतानगर येथील मनोज भीमराव उगले यांनी आपली एम.एच.२२- एएच ४२१९ क्रमांकाची दुचाकी रेल्वे स्टेशन परिसरातील गोकुळनगर प्लॅटफार्मसमोर उभी केली होती. चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली. उगले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण
नांदेड : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका चालक व त्याच्या कुटुंबीयाला मारहाण केल्याची घटना ३० मे रोजी किनवट तालुक्यातील बोधडी बु. येथे घडली. ३० मे रोजी अनिल भगवान जोंधळे हे घरी थांबले असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अनिल जोंधळे यांना कुऱ्हाडीने मारून जखमी केले. यावेळी आई सोडविण्यास आली असता त्यांना मारहाण करीत गळ्यात मंगळसूत्र लंपास केले. त्यांच्या भावालाही मारहाण करून मोबाइल पळविला. जोंधळे यांच्या या तक्रारीवरून किनवट ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड : जुन्या नांदेडातील हबिबिया काॅलनी येथे नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने मटका अड्ड्यावर धाड टाकून जुगाऱ्यांना पकडले. हबिबिया कॉलनीत मिनल डे नावाचा मटका सुरू होता. येथे धाड टाकून पोलिसांनी ३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पो.ना. पद्मसिंह कांबळे यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अवैध दारू पकडली
नांदेड : देगलूर तालुक्यातील कावलगाव येथील बळेगाव पॉइंट येथे देशी दारूची अवैध दारूविक्री सुरू होती. पोलिसांनी धाड टाकून १ हजार ४४० रुपयांची देशी दारू तसेच एक दुचाकी जप्त केली. पो.ना. पल्लेवाड यांच्या तक्रारीवरून देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल केला. अन्य एका घटनेत नायगाव तालुक्यातील टाकळी शिवारात गळेगाव फाटा येथे अवैध दारूविक्री सुरू होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत १४ हजार ७२० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. पोहेकॉ पंडित राठोड यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.