शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:40 IST

कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर आढळले होते कर्मचारी

ठळक मुद्देसहायक जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

किनवट (जि. नांदेड) : सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अचानक भेटीवेळी काही जण कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर आढळले होते, तर काही मुख्यालयी वास्तव्यास नव्हते. यासह इतर हलगर्जीपणा समोर आला होता. यामुळे आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी २५ फेब्रुवारी रोजी किनवट तालुक्यातील अनेक गावांना अचानक भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाड्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी गैरहजर असणाऱ्या तसेच कामकाजात अनियमितता असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव संबंधित विभाग प्रमुखांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. 

सहायक जिल्हाधिकाऱ्यांचा दणकासहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या भेटीवेळी राजगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवत आरोग्य केंद्राचे औषधनिर्माण अधिकारी बी.डी. सादुलवार आणि कनिष्ठ सहायक चांदू केरबा कंधारे या दोघांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मलकापूर, खेरडा आरोग्य उपकेंद्राचे काही कर्मचारीही रडारवर असून काही डॉक्टरांनाही नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी दिली. 

लोकांची कामे तत्परतेने होत आहेत की नाहीत? हे तपासण्यासाठीच शासकीय कार्यालयांना अचानक भेटी दिल्या होत्या. तालुक्यातील इतर ठिकाणीही अशाच पद्धतीची मोहीम राबविण्यात येणार आहे.- अभिनव गोयल, सहायक जिल्हाधिकारी  

टॅग्स :NandedनांदेडsuspensionनिलंबनNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड