शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 30, 2017 18:22 IST

नायगाव बाजार- नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथे नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 30 - नायगाव बाजार- नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथे नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दोन्ही मुलांना पोहता येत नव्हते तरीही ते नदीत उतरले होते. या घटनेमुळे कोकलेगावावर शोककळा पसरली आहे. अविनाश दिगांबर डोईफोडे हा इज्जतगाव येथे इयत्ता सातवीत शिकत होता़ सुट्यामुळे तो मावशीच्या गावी नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथे आला होता़ या ठिकाणी शेजारी असलेल्या परबत मसनाजी शेळके (१४) या मुलासोबत तो सोमवारी सायंकाळी खेळत होता़ खेळल्यानंतर दोघेही जण पोहण्यासाठी गोदावरी नदीवर गेले़ त्यानंतर दोघेही पाण्यात उतरले़ यावेळी पाण्याच्या खोलीचा नेमका अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. परिसरात त्यावेळी कुणी नसल्यामुळे त्यांना कुणी वेळेवर मदतही करु शकले नाही़ ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. मुले घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. रात्री नदीपात्राजवळ दोघांचेही कपडे आढळले. त्यानंतर गावातीलच काही तरुणांनी पाण्यात उतरुन शोध घेतला़ यावेळी परबत शेळके याचे प्रेत सापडले, परंतु अविनाश मात्र सापडत नव्हता. रात्री उशिरा गावकऱ्यांनी शोधकार्य थांबविले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरु करण्यात आला़ त्यावेळी अविनाशचेही प्रेत सापडले. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.