शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापौरपदासाठी दोन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:15 IST

नांदेडच्या महापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आहे़

ठळक मुद्दे१ जून रोजी होणार महापौर पदाची निवडणूक विशेष सभेचे आयोजन

नांदेड : नांदेडच्यामहापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आहे़नांदेड महापालिकेच्या महापौर शीलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता़ या रिक्त पदाची माहिती विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर महापौर निवडीचा कार्यक्रम २८ मे रोजी घोषित करण्यात आला़ त्यानुसार १ जून रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा होईल़ ३० मे च्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती़ महापौर पदासाठी काँग्रेसच्या दीक्षा धबाले यांनी तर भाजपाकडून बेबीताई गुपिले यांनी अर्ज भरला आहे़काँग्रेसच्या उमेदवार दिक्षा धबाले यांचा अर्ज भरताना विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर, माजी महापौर शिला भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभापती फारुख अली खान, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, बापुराव गजभारे, शमीम अब्दुला, श्रीनिवास जाधव, पूजा पवळे आदींची उपस्थिती होती.महापालिकेत काँग्रेसचे ८१ पैकी ७४ नगरसेवक आहेत़ भाजपाचे ६, शिवसेना १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे़ या संख्याबळाच्या आधारे ही निवडणूक काँग्रेस एकतर्फी जिंकेल, असेच चित्र आहे़ १ जून रोजी महापौर निवडीसाठी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.नांदेडचे महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे़ काँग्रेसने महापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फार्म्युला निश्चित केला होता़ या फार्म्युलानुसार शीलाताई भवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ त्यांना जवळपास १७ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला़ आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि उर्वरित कालावधी पाहता नव्या महापौरांना केवळ १० महिने या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाMayorमहापौरElectionनिवडणूक