शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर, विजाही कोसळत आहेत. याच काळात शेतीकामे सुरू असतात. ...

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर, विजाही कोसळत आहेत. याच काळात शेतीकामे सुरू असतात. त्यामुळे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. त्यामुळे आकाशात विजा कडाडत असताना नागरिकांनी काही खबरदारी घेण्याची गरज आहे.

आजघडीला प्रत्येकाजवळ मोबाइल आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट होत असताना, सर्वप्रथम आपल्याजवळील मोबाइल बंद करणे आवश्यक आहे, तसेच झाडांपासून शक्यतो दूरच राहावे. कारण झाडावरच सर्वाधिक वीज कोसळण्याचा धोका असतो. झाडाखाली आसऱ्यासाठी थांबलेल्या अनेक शेतकऱ्यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.

घरात असताना घ्या खबरदारी

n विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास घराबाहेर पडणे शक्यतो टाळा, जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

n आकाशात विजा चमकत असताना घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल, तर घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा. पाण्यात उभे असाल, तर तत्काळ पाण्याबाहेर पडा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहा, तसेच मोबाइल बंद करा आणि लँडलाइनचा वापर करू नका.

सर्वाधिक मृत्यू शेतकऱ्यांचे

विजा पडून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे शेतकऱ्यांचे झाले आहेत. शेतात काम करीत असताना, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यास शेतकरी आणि मजूर हे जवळ असलेल्या झाडाखाली आसरा घेतात. विशेष करून, झाडावरच अधिक वीज कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. झाडाखाली थांबण्याऐवजी उघड्या मैदानात थांबावे. लोखंडी शेड किंवा उंच झाडाचा आसरा घेऊ नये. अशा प्रकारे खबरदारी बाळगल्यास हे मृत्यू रोखता येणार आहेत.