शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेला धान्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

नांदेड : राज्य शासनाने ९ वी ते १२ वी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरू ...

नांदेड : राज्य शासनाने ९ वी ते १२ वी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य असून आदिवासी आश्रमशाळेतील चित्रही असेच आहे. जिल्ह्यात ४४ आश्रमशाळा सुरू असून वसतीगृहे मात्र अद्याप बंदच आहेत. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा तसेच निधी उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणचे विद्यार्थी अद्याप घरीच बसून आहेत.

कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळीनंतर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्केच आहे. तर आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीही आश्रमशाळेत आले नाहीत. काही ठिकाणी अनिवासी आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. मात्र निवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनुदानित आश्रमशाळेला वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने या आश्रमशाळाही अडचणीत आल्या आहेत.

आदिवासी विभागाच्या जिल्ह्यात १६ शासकीय तर १६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या ठिकाणी एका शाळेत सरासरी ४०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या आश्रमशाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय नसल्याने या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

आश्रमशाळांसमोर अडचणी

कोरोनामुळे मागील आठ, नऊ महिन्यापासून बंद असलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या असून आदिवासी विभागाच्या आश्रमशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहाराची सोय होत नसल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अद्याप येत नसल्याचे तसेच अनुदानित आश्रमशाळेला निधी मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४४ आश्रमशाळा असून या आश्रमशाळा शासन निर्णयानुसार कोरोना विषयक सर्व नियम पाळून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत असून लवकरच आश्रमशाळेतील उपस्थिती शंभर टक्के होईल.

- माळवदकर, समाजकल्याण अधिकारी, नांदेड