शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पदाेन्नतीवरील पदस्थापनेनंतर बदली कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

रूपाली नागरे या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत अव्वल कारकुनाने ॲड. गाैरव अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटमध्ये याचिका दाखल केली हाेती. ...

रूपाली नागरे या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत अव्वल कारकुनाने ॲड. गाैरव अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटमध्ये याचिका दाखल केली हाेती. रूपाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत हाेत्या. २३ जून २०२० राेजी अव्वल कारकूनपदी बढती देऊन त्यांना तेथेच नेमणूक देण्यात आली. तेथे दाेन महिने काम केल्यानंतर त्यांची अचानक येवला तालुक्यामध्ये बदली केली गेली. पदाेन्नतीनंतर चुकून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात काम दिले. वास्तविक त्यांना येवला येथेच नेमणूक द्यायची हाेती, ती चुकीची दुरुस्ती आम्ही केली, असे सरकार पक्षातर्फे सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी सांगितले. शिवाय पदाेन्नतीनंतरच्या पदस्थापनेला बदली कायदा लागू नसल्याचा युक्तिवाद गायकवाड यांनी केला. मात्र मॅटने तो फेटाळून लावला. एकदा पदाेन्नतीवरील पदस्थापना झाली की त्यापुढील काेणत्याही बदलीसाठी बदली कायद्याच्या तरतुदी लागू हाेतात. रूपाली नागरे यांची दाेन महिन्यांत बदली करण्यामागे विशेष कारण, नागरी सेवा मंडळाची बैठक, सक्षम अधिकाऱ्यांचा आदेश, महसूलमंत्री अथवा राज्यमंत्र्यांची मंजुरी यांपैकी काहीही रेकाॅर्डवर उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा नागरे यांच्याबाबत दीड महिन्यात अनेक तक्रारी आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बदली केल्याचे सरकारी पक्षाने सांगितले. याबाबतच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतरच बदली आदेश जारी केल्याचे सांगितले गेले.

चाैकट....

विभागीय आयुक्त ऑथाॅरिटी नाहीत

मध्यावधी बदलीसाठी विभागीय आयुक्त हे ऑथाेरिटी नसून त्याला मंत्री, राज्यमंत्र्यांची मंजुरी बदली कायद्यानुसार बंधनकारक असल्याचे ‘मॅट’ने स्पष्ट केले. अखेर रूपाली नागरे यांची बदली रद्द करण्यात आली. त्यांना या प्रकरणात आधीच स्थगनादेश देण्यात आला हाेता. या प्रकरणी याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भूषण अरविंद बांदिवडेकर व ॲड. गायत्री बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.