शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

असना नदीच्या पुरात शेतातून चारा घेऊन येणारा मुलगा बैलगाडीसह वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 20:42 IST

Aasana River Flood : नदीपलीकडील शेतातून चारा घेऊन येत असतांना अचानक नदीला पूर आला

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड) : ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सायंकाळी असना नदीला अचानक पूर आला. या पुरात एक मुलगा बैलगाडीसह वाहून गेला असल्याची घटना पिंपळगाव महादेव येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे तात्काळ शोध कार्य सुरू केले. पुरात वाहून गेलेले बैल मृतावस्थेत सापडले असून मुलाचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील असना नदीला ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर आला.नदीपलीकडील शेतातून चारा घेऊन येत असतांना या पुरात पिंपळगाव महादेव येथील निवृत्ती बालासाहेब कल्याणकर यांच्या शेतातील शेतमजूर यांचा मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे ( मुळगाव बळेगाव ता.नायगाव ) हा शेताकडुन बैलगाडी घेऊन येत असतांना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला. ही घटना माहिती होताच अर्धापूर पोलिस व महसुल प्रशासन आणि अग्निशामक विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाची एक गाडी बोट व जवानांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मुलाची शोध मोहीम सुरू होती.

यावेळी घटनास्थळी उपविभागिय अधिकारी विकास माने, महसुल साहाय्यक गरूडकर, तहसीलदार उज्वला पांगरकर ,नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलिस निरीक्षक अशोक जाधव,संजय खिल्लारे,तलाठी चंद्रकांत महाजन,संतोषराव कल्याणकर,कपिल दुधमल,उध्दवराव कल्याणकर,अजय देशमुख व ग्रामस्थ आदींचे घटनास्थळी मदत कार्य सुरू होते.

टॅग्स :floodपूरNandedनांदेड