शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या खुनात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:29 IST

विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़

नांदेड : विष्णूपुरी भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणानंतर तिघांनी एकाला जबर मारहाण करीत खंजीरने वार करुन खून केला़ ही घटना २०१७ मध्ये घडली होती़ याप्रकरणी जिल्हा न्या़ व्ही़ के़मांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़१२ मार्च २०१७ रोजी विष्णूपुरी परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मयत ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे याच्यासोबत सुनील भारती (रा़भारतीमठ, गाडीपुरा) व आकाश बालाजी बारसे (रा़विष्णूपुरी) हे दोघे जण दारु पीत बसले होते़ यावेळी त्यांच्या शेजारीच दारु पीत बसलेल्या रामा बळीराम गायकवाड रा़विष्णूपुरी याला ज्ञानेश्वर हंबर्डे याने आमच्यासोबत बस असे म्हणून बोलावून घेतले़ त्यानंतर ज्ञानेश्वरने रामाला तू श्याम मराठे याला का मारहाण केली, असे म्हणून वाद घातला़ त्यानंतर ज्ञानेश्वर याने रामाला मारहाण करण्यास सुरुवात केली़ हा प्रकार पाहून रामा आणि सुनील याने ज्ञानेश्वर हा नेहमी दारु पिऊन आपल्याला मारहाण करतो़ त्याला एकदाची अद्दल घडवू असे म्हणत त्यांनी ज्ञानेश्वरला मारहाण करण्यास सुरुवात केली़सुनीलने जवळील चाकू काढला़ परंतु, झटापटीत तो खाली पडला़ यावेळी रामा याने तो चाकू उचलून ज्ञानेश्वरवर वार केले़ त्यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी भास्कर बालाजी हंबर्डे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविला़ फौजदार पीक़े़मराडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले़ त्यानंतर न्या़व्हीक़े़मांडे यांनी रामा गायकवाड, सुनील भारती आणि आकाश बारसे या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारच्या वतीने अ‍ॅड़संजय लाठकर यांनी बाजू मांडली़आरोपीने पोलिसाला केली होती मारहाणखुनाच्या प्रकरणाची नांदेड न्यायालयात सुनावणी सुरु असताना पालीस तिन्ही आरोपींना घेवून कोर्टात आले होते़ यावेळी जेवणाच्या कारणावरुन आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगाविली होती़ या प्रकरणात आरोपींच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयMurderखून