शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
3
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
4
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
6
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
7
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
8
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
9
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
10
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतर मिळाला नांदेड तयबाजारी लिलावाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:44 IST

मागील तीन वर्षांपासून रखडलेला तयबाजारी लिलाव अखेर पूर्ण झाला असून ४ ठेकेदारांच्या स्पर्धेत महापालिकेला ७२ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या पहिल्या सभेत या लिलाव प्रक्रियेला मान्यता मिळाली. स्थायीच्या सभेमध्ये १५ विषयांनाही मंजुरी देण्यात आली.

नांदेड : मागील तीन वर्षांपासून रखडलेला तयबाजारी लिलाव अखेर पूर्ण झाला असून ४ ठेकेदारांच्या स्पर्धेत महापालिकेला ७२ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या पहिल्या सभेत या लिलाव प्रक्रियेला मान्यता मिळाली. स्थायीच्या सभेमध्ये १५ विषयांनाही मंजुरी देण्यात आली.

स्थायी समिती सभापती अब्दुल शमीम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १५ विषय ठेवण्यात आले होते. हे सर्व विषय एकमुखाने पारित करण्यात आले. त्यामध्ये शहरातील तयबाजारीचा विषय मार्गी लागला आहे. महापालिका हद्दीमध्ये आठवडी बाजार व भाजीपाला बाजारामध्ये भाडे वसुली अर्थात तय बाजारीसाठी २०१४-१५ मध्ये महापालिकेला ७२ लाख रुपये मिळाले होते. २०१५-१६ मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत ९० लाख ५० हजार रुपये महापालिकेला उत्पन्न मिळाले होते. मात्र या लिलाव प्रक्रियेतील ठेकेदाराने आवश्यक ती रक्कम न भरल्याने त्या ठेकेदाराविरुद्ध महापालिकेने कारवाई केली होती. इतकेच नव्हे, तर त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. इनामदार इंटरप्राईजेसच्या नावे खोट्या व बनावटी पावत्या छापून वसुली केली होती.

महापालिकेतील जवळपास साडेसात लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ठेकेदार सय्यद जियाउद्दीन, सय्यद सुलतानोद्दीन, शेख असलम आणि  मोहम्मद इस्माईल तन्वीर या चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत चार ठेकेदारांनी भाग घेतला. त्यातील शेख फेरोज शेख अहेमद या ठेकेदाराला ७२ लाख ५० हजार रुपयामध्ये तयबाजारीचा ठेका देण्यात आला आहे. 

स्थायीमध्ये माध्यमांना प्रवेशबंदी कायमस्थायी समितीमध्ये माध्यमांना  प्रवेश न देण्याचा पायंडा सभापती अब्दुल शमीम यांनी कायम ठेवला आहे. शिवसेनेचे विद्यमान आ. हेमंत पाटील यांनी स्थायी समितीमध्ये माध्यमांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. स्थायीमधील पारदर्शक कारभार जनतेपुढे जावा यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला होता. पुढे धबाले यांच्या कार्यकाळात माध्यमांना स्थायी समितीमध्ये प्रवेश बंदी केली. ती यावेळीही कायम राहिली़ या बैठकीत छायाचित्र घेण्यासाठीही प्रतिबंध घालण्यात आला़ या निर्णयावरुन स्थायी समितीची आगामी काळातील वाटचाल स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेड