शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

छेडखानीच्या आरोपावरुन तरुणाची काढली धिंड

By admin | Updated: March 5, 2017 21:09 IST

जनरल स्टोअर्स चालविणाऱ्या एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय गावपुढाऱ्यांनी त्याच्या तोंडाला काळे

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि.5 - अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जनरल स्टोअर्स चालविणाऱ्या एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय गावपुढाऱ्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासून गावभर वाजत-गाजत धिंड काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या गंभीर घटनेची मात्र अर्धापूर पोलिसात आतापर्यंत अदखलपात्र अशीच नोंद असून घटनेनंतर तरुण बेपत्ता झाला असून ठाण्यात छेडछाडीची मात्र कुठलीही तक्रार नाही़ जनरल स्टोअर्स चालविणाऱ्या एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत गावातीलच काही जणांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली़ त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले़ गळ्यात अन् डोक्यावर चपलांच्या माळा घालून मारहाण करीतच त्याची गावभर धिंड काढण्यात आली़ मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेला तरुणाच्या समोर बँडही वाजविण्यात येत होता़ जवळपास दोनशे ते तीनशे जणांचा हा गट त्या तरुणाला मारहाण करीत गावभर फिरवित असताना, पोलिसांनी मात्र यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही हे विशेष़ त्यानंतर तरुणाला मारहाण करीतच ठाण्यात नेण्यात आले़ या ठिकाणी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला़ सदरील घटनेनंतर मात्र तो तरुण बेपत्ता झाला आहे़ त्याच्या कुटुंबियांनेही गाव सोडले आहे़ संबंधित घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ याबाबत अर्धापूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वाळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र या प्रकाराबाबत अद्याप माझ्याकडे कोणतीही माहिती आली नसून या संदर्भात अर्धापूर पोलिस निरिक्षकांना विचारतो अशी प्रतिक्रिया दिली़ (प्रतिनिधी)