शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सचखंड गुरुद्वारा येथील तख्तस्नानात हजारो भाविकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:21 IST

नगिनाघाट भागात श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंगजी आणि संत बाबा नरिंदरसिंगजी यांनी स्वागत केले.

ठळक मुद्देनांदेडमध्ये देश-विदेशांतील भक्तांची गर्दीहजारो भाविकांनी गोदावरीतून पवित्र जल भरून तख्त स्नान केले. 

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत तख्त स्नान सोहळा पार पडला. यावेळी गुरुद्वारा परिसर आणि गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची गोदावरीच्या पाण्याने स्वच्छता करण्यात आली.

गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक रणजितसिंह चिरागिया म्हणाले, सकाळी संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी तख्त स्नानाची अरदास केली. त्यानंतर दहा वाजता दरबार साहिब येथे भाई राम सिंहजी यांनी अरदास करून घागरिया सिंग यांना गोदावरीतून पाणी आणण्यासाठी रवाना केले. घागरिया सिंग भाई प्रकाशसिंग चिरागिया सकाळी साडेदहा वाजता भाविकांना घेऊन चांदीच्या घागरीत गोदावरीतून पाणी आणण्यासाठी गेले. 

नगिनाघाट भागात श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंगजी आणि संत बाबा नरिंदरसिंगजी यांनी स्वागत केले. घागरिया सिंग यांनी नगिनाघाट येथे गोदावरी नदीजवळ पोहोचून अगोदर नदीची पूजा केली. त्यानंतर पाणी भरून गुरुद्वाराच्या गुंबदला स्नान घालण्यात आले. दुसऱ्या फेरीत हजारो भाविकांनी गोदावरीतून पवित्र जल भरून तख्त स्नान केले. दरबारला सुंगधित पाणी, दूध आणि दहीमिश्रित पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींदरसिंग बुंगई, गुरमितसिंग महाजन, मनप्रीतसिंग कुंजीवाले यांच्यासह देश-विदेशातील शेकडो भाविकांची उपस्थिती होती, तसेच श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची ऐतिहासिक शस्त्रे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर त्यांचीही स्वच्छता केली.

टॅग्स :Sachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडNandedनांदेड