शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मंदिराचा विषय राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़

ठळक मुद्देहुंकार सभाविहिंपचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांचे प्रतिपादन

नांदेड : कोट्यवधी हिंदूची आस्था असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिराचा विषय हा हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीदचा नसून राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा आहे़ रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नवीन मोंढा मैदानावर हुंकार सभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते़ देशपांडे म्हणाले, राम मंदिरासाठी १५२८ पासून संघर्ष सुरु आहे़ राम हे केवळ शंभर कोटी हिंदूचे नव्हे, तर अनेक जाती-धर्मातील लोकांसाठी पुजनीय आहेत़ इंडोनेशियासारख्या मुस्लिमबहुल देशात भगवान श्रीरामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे़ त्यांच्या नोटेवर श्रीगणेशाचे चित्र आहे़ त्यामुळे इंडोनेशियाचा आदर्श घेतल्यास देशातील अनेक प्रश्न सहज सुटतील़ धर्मा-धर्मात भांडणे होणारच नाहीत़ अयोध्येतील राम मंदिरावर बाबराने तब्बल ७६ वेळा स्वाऱ्या केल्या़ त्यावेळी साडेतीन लाख लोकांची कत्तल झाली़ त्याचप्रमाणे सोमनाथावर गझनीने स्वारी करुन ते मंदिर तोडले होते़ तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून संसदेत कायदा करुन सोमनाथाचे मंदिर उभारण्यात आले़अयोध्या आणि सोमनाथचा इतिहास एकसारखाच आहे़ अयोध्येवरही विदेशी आक्रमकांनी स्वारी केली़ असे असताना अयोध्येतील मंदिरासाठी वेगळा न्याय का? २२ वर्षे उच्च न्यायालयात चाललेले हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे़ या ठिकाणी आणखी किती वर्षे लागतील हे सांगता येणे शक्य नाही़ हा खटला लांबविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत़ त्यामध्ये माओवाद्यांची बाजू उचलून धरणा-यांचाही समावेश आहे़न्यायाला विलंब करणे म्हणजेच न्याय आकारणे हे साधे सूत्र आहे़ त्यामुळे संसदेत राम मंदिर उभारणीचा कायदा झालाच पाहिजे़ त्याचबरोबर देशातील जी गुलामीची प्रतीके आहेत ती हटविलीच गेली पाहिजे़ राम मंदिर उभारणीचे दोन तृतीयांश काम पूर्ण झाले असून सुरुवात केल्यास दोन वर्षात मंदिर उभे राहील असेही ते म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर वीरुपाक्ष महाराज, बालयोगी देवपुरी महाराज, आनंद बन महाराज, ह़भ़प़चंद्रकांत महाराज लाठकर, ह़भ़प़माधव महाराज केंद्रे, ताराबाई बोमनाळे, कृष्णा देशमुख यांची उपस्थिती होती़

  • सत्याच्या विजयासाठी आपण लढा देत आहोत़ शीख धर्मातही प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे़ श्री गुुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी अवधपुरीत रामाचा जन्म झाल्याचे नमूद करुन ठेवले आहे़ त्यामुळे जन्म झाला त्याच ठिकाणी प्रभू रामाचे मंदिर व्हायला पाहिजे़ कोणत्याही धर्मातून धार्मिक ग्रंथ आणि स्थळ हटविले तर तो धर्मही नामशेष होतो़ त्यामुळे सरकारने चूक सुधारत स्वखर्चाने मंदिर उभारावे, असे प्रतिपादन सरबजित निर्मल यांनी केले़
टॅग्स :NandedनांदेडRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिर