भीतीतून उखळले जाताहेत हजारो रूपये
रेमडिसीवीर उपलब्ध करून देणारे काही तरूण रूग्णालय परिसरात रात्रंदिवस दिसून येत आहेत. सदर तरूण सहजरित्या गरजू नातेवाईकांना बोलतात. त्यातून आम्हाला इंजेक्शन मिळाले तुम्हाला हवे का? पण पैसे जास्त लागतात, असा संवाद साधून नातेवाईकांचा विश्वास संपादन करतात. अगोदरच चौकशी करूनही रेमडिसीवीर मिळत नसल्याने हतबल झालेले नातेवाईक तरूणाला हो भरतो, त्यानंतर हजर असलेल्यापैकी एखादा तरूण फोनद्वारे चौकशी करतो. आपल्या जवळचे आहेत कमी करा, असे तसे बोलून नातेवाईकांनाही पटवून देतो. तुम्ही जवळचेच आहात सांगितले, त्यामुळे सहा ते आठ हजारात मिळत आहे. जीव वाचविण्याच्या भितीने पैशाचा विचार न करता नातेवाईकही मागेल तेवढे पैसे काढून देताहेत. त्यानंतर एक तरूण गाडी घेवून जातो अन् दहाच मिनिटात रेमडिसीवीर घेवूनही येतो.
नोडल अधिकारी नावालाच
रेमडिसीवीरचा होणारा काळा बाजार सेना पदाधिकारी जैन यांनी उघड केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना ताब्यात घेतले. परंतु, त्यानंतरही हा गाेरख धंदा बंद झालेला नाही. त्यात रेमडिसीवीर उपलब्ध करून देण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारीही केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. तीनपैकी केवळ औषध निरीक्षक माधव निमसे यांचा फोन लागतोय, उर्वरित दोघांचे फोन सायंकाळपर्यंत बंदच येत होते.