शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील आणखी दोन तालुक्यांना हवे तेलंगणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:01 IST

धर्माबादपाठोपाठ जिल्ह्यातील हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यातील काही नागरिकांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. तेलंगणातील विकासाची गती पाहता महाराष्ट्रातील तीन तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देधर्माबादपाठोपाठ बिलोली, हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनी केली तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धर्माबादपाठोपाठ जिल्ह्यातील हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यातील काही नागरिकांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. तेलंगणातील विकासाची गती पाहता महाराष्ट्रातील तीन तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मात्र या तिन्ही तालुक्यांत शासनाच्या योजना योग्यरितीने राबविल्या जात असल्याचा दावा केला आहे.आठ ते दहा दिवसांपूर्वी धर्माबाद तालुक्यातील ३५ गावच्या सरपंचांनी बैठक घेवून आपल्या गावांचा तेलंगणात समावेश करावा, अशी मागणी केली. मूलभूत सुविधांचा अभाव रस्त्यांचा प्रश्न यासह राज्य शासनाने विकासाकडील दुर्लक्ष ही कारणे या ३५ गावच्या सरपंचांनी पुढे केली आहेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्याचीही तयारी सुरु आहे. तेलंगणातील धर्माबाद तालुक्यातील या ३५ गावच्या सरपंचांकडून झालेली मागणी जिल्हा प्रशासनाने कितपत विचारात घेतली ही बाब चर्चेला असतानाच धर्माबादपाठोपाठ आता हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतूनही अशीच मागणी पुढे आली आहे.हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षांनी हिमायतनगर तालुक्याचा तेलंगणा राज्यात समावेश करण्याची मागणी अल्पसंख्याक विभागाचे फेरोज खान युसूफ खान यांनी एका बैठकीत केली. तालुक्यातील शिष्टमंडळही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. निजामाच्या काळात हिमायतनगर तालुका तेलंगणामध्ये समाविष्ट होता. मुधोळ मंडळातून या गावांचा कारभार केला जात होता. पुढे राज्य निर्मितीमध्ये महाराष्ट्रात हिमायतनगरचा समावेश करण्यात आला.सीमावर्ती भागातील अनेक गावांचा विकास झाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यातील सध्या राबविल्या जाणाऱ्या योजना सीमावर्ती तालुक्यातील नागरिकांना आकर्षित करत आहेत. यामध्ये पेरणीपूर्वी प्रतिएकरी दिले जाणारे चार हजार रुपयांचे अनुदान, आरोग्य सुविधा आदींचा समावेश आहे.याच आकर्षणातून बिलोली तालुक्यातील सगरोळी येथेही काही ग्रामस्थांनी बैठक घेत तेलंगणात बिलोली तालुक्याचा समावेश करण्याची मागणी केली. सगरोळीतील माणिकप्रभू मंदिरात ही बैठक झाली.बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधेपासून वंचित असलेल्या तेलंगणाच्या सीमेवरील जवळपास २५ ते ३0 गावांतील गाव प्रमुख व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन २७ मे रोजी या महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा चांगला अशा मागणीच्या विचाराने सगरोळीच्या माणिकप्रभू मंदिरात तेलंगणात समावेश होण्याचा निर्णय घेत पुढील रणनीती आखण्यात आली आहे.या सीमावर्ती भागात सगरोळी या मोठ्या बाजारपेठेसह अन्य २५ ते ३० गावांचा समावेश आहे.या भागातील लोकांना तेलंगणातील नागरिकांना मिळणाºया सुविधा महाराष्ट्रापेक्षा अधिक चांगल्या दिसत आहेत. अगदी २-३ किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणाच्या सुंकणी, मंधरणा, हुस्सा, कादेपुर, सालुरा, तग्याळ, खंडगाव आदी गावांतील नागरिकांना मिळणाºया सोयीसुविधेची जाणीव येथील लोकांना होत असून याकडे सीमावासीय आकर्षित झाले आहेत. सगरोळी येथे झालेल्या बैठकीस मांजरा बचाव कृती समितीचे अध्यक्ष गंगाधर प्रचंड, गोविंद मुंडकर, सगरोळीचे सरपंच व्यंकटराव सिदनोड, कार्ला बु़चे सरपंच राजेंद्र पा.जामनोर, खंडेराय देशमुख, व्यंकट भरडे, चंद्रकांत जाधव, माणिकराव बामणे आदींनी शासनाविषयी संतप्तजनक भावना व्यक्त केल्या.यावेळी बाबूराव इंगळे, संजय पोवाडे, सय्यद रीयाज, सुनील जठाळकर, शिवराज याबनोड, किशन सिद्धापुरे, शिवकुमार बामणे, दत्ताञय कोटनोड, संजय याबनोड, राजेश्वर सगरोळीकर, व्यंकट बामणे, शेख मुतुर्जा, शिवराज अर्धापुरे, हनमंत बामणे, बालाजी महाजन, संभाजी खिरप्पवार, मनोहर यदलोड, श्रीनिवास दम्मयावार, अनिल मेंडगुळे, किरण जेठे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजू पा.शिंदे शिंपाळकर यांनी केले.---जिल्हाधिकाºयांनी ‘त्या’ सरपंचांना चर्चेला बोलावलेसीमावर्ती भागातील धर्माबाद तालुक्यातील ३५ गावांच्या सरपंचांनी तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हास्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. धर्माबादच्या ‘त्या’ सरपंचांची तहसीलदारांनी चर्चा केली.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या सरपंचांना चर्चेसाठी बोलाविले आहे. त्याचवेळी या सरपंचांचे कोणतेही अधिकृत पत्र आपल्यापर्यंत प्राप्त झाले नसल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तेलंगणातील माध्यमांमध्ये या विषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांना सूचना दिल्या आहेत. धर्माबादसह अन्य तालुक्यांतील सीमावर्ती भागातील काही प्रश्न असतील तर त्यासाठी चर्चा केली जाईल. त्यांचे प्रश्न सोडविले जातील असेही ते म्हणाले.जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा केला जात आहे. वाळू महसुलातून मिळणाºया एकूण उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम ही त्या-त्या ग्रामपंचायतीला दिली जात आहे. यासह आमदार, खासदार निधी, जि. प. चा निधी विकासकामासाठी उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाचे विकासकामावर लक्ष आहे. त्याचवेळी जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले हेही ३ आणि ४ मे रोजी नांदेड जिल्ह्यात होते. विशेष म्हणजे, डवले यांनी धर्माबाद तालुक्यास भेट देवून विकासकामाची पाहणी केली होती. यावेळी कोणीही चर्चेसाठी अथवा मागण्या घेऊन पुढे आले नव्हते.---वर्षभरात एक हजार कोटींहून अधिक अनुदानजिल्ह्यात शासनाकडून सुविधा दिल्या नाहीत ही बाब निश्चितच समर्थनीय नाही. मागील वर्षभराचा कालावधी पाहता जिल्ह्यात पीक विमा अनुदानापोटी ५०२ कोटी, बोंडअळी नुकसानीचे पहिल्या टप्प्यातील १७५ कोटी, गारपीटग्रस्त शेतकºयांना अनुदान, खरीप अनुदान असे जवळपास १ हजार कोटींहून अधिक रुपयांचे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले आहे.त्याचवेळी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, प्राथमिक रुग्णालयापासूनची जिल्हा रुग्णालयापर्यंतची आरोग्य सुविधा, स्वस्त धान्य योजना आदी योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना दिला जातो. जिल्ह्याच्या ठिकाणी राबविण्यात येणाºया सर्व योजना सीमावर्ती भागातील गावांमध्ये राबविल्या जातात. त्यामुळे या गावांना वेगळा न्याय द्यावा, अशी भूमिका निश्चितपणे समर्थनीय नाहीच, हेही स्पष्ट आहे.

टॅग्स :Nandedनांदेडtahasil chowkतहसील चौकTelanganaतेलंगणा