कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांवर कोरोना कक्षासह अन्य जबाबदार्या सोपविण्यात आल्या होत्या. ही लाट ओसरत असतानाच दुसरी लाट अधिक तीव्र स्वरूप धारण करून आली. कोरोना बाधीतांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अशा कठीण काळात १ हजार ७०० शिक्षक कोवीड योद्धा म्हणून काम करत आहेत. असे असतानाही त्यांना विमा संरक्षण देण्याची बाब गांर्भियाने घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.
चौकट- शिक्षकांना कोरोना काळात काम करत असताना मृत्यू आल्यास ते कुटंंबिय उघड्यावर पडत आहे. अशा वेळेस त्यांना मदतीची गरज आहे. या शिक्षकांना कोरोनाचे विमा कवच द्यावे.
चौकट- शिक्षकांना पहिल्या लाटेत विमा कवच होते. मात्र डिसेंबरपासून सदरील लाभ बंद आहे. त्यामुळे शासनाने शिक्षकांना विमा कवच देणे आवश्यक आहे. कोरोनोच्या कठीण काळात शिक्षक सेवा बजावत आहेत. त्यामुळे शिक्षकांना विमा कवच तातडीने द्यावे. ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यावर निर्णय घ्यावा.
चाैकट- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मिळून १ हजार ७०० शिक्षक कोरोना साथ नियंत्रण कामाच्या माेहिमेवर आहेत. जवळपास ५०शिक्षकांचे या काळात मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव तयार करण्यात येणार असून ते शासनाकडे पाठविले जातील. - शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, नांदेड.
कोविड लाटेला तोंड देण्यासाठी शिक्षकांना विविध केंद्रामध्ये आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी पाठविले जात असून अशा कोविड संकटात काम करणार्या शिक्षकांना पीपीई कीटस आणि अन्य साहित्य देण्यास टाळाटाळ करण्यात येवू नये. तसेच इतर आरोग्य सेवकाप्रमाणे शिक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे. - मधुकर उन्हाळे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई.