बैठकीस जिल्हा पोलीस अधिकारी प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनील लहाने, महिला व बालविकास अधिकारी आर.पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यात कोविड-१९ मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे नेमकी अनाथ झालेली मुले आहेत का याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. ही वस्तुस्थिती नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार हे अनाथ बालके असल्यास त्यांची सत्यता पडताळून टास्क फोर्सला माहिती सादर करतील. शून्य ते ६ वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे ६ ते १८ गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाइल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी १०९८ या टोल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST