शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून मतासाठी प्रतीकांचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:04 IST

निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला़

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा आरोप

नांदेड: निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला़राज्य आणि देशातील दलितांच्या मतांवर भाजपचा डोळा आहे़ त्यामुळे इंदू मिलचे घाईघाईने भूमिपूजन करण्यात आले़, परंतु भाजपचे असे वागणे आता सर्वांच्या लक्षात आले़ इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचे काम त्वरित सुरु न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही वाघमारे यांनी दिला़नांदेड जिल्ह्यावर काँग्रसचे वर्चस्व  अबाधित आहे. जिल्ह्यातील बहुतांश संस्था, समित्यांवर काँग्रेसचीच सत्ता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सध्यातरी काँग्रेसमोर कुठलाही सशक्त प्रतिस्पर्धी नसल्याने महापालिकेत काँग्रेस बहुमताने निवडून येईल, असा विश्वासही वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला आ. डी. पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.फडणवीस हुकूमशहामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुकूमशहा आहेत़ कल्याण-डोंबिवलीची निवडणूक सुरु असताना, आचारसंहितेचा भंग करीत त्यांनी  साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते़ या निवडणुकीला दोन वर्षे लोटली आहेत, परंतु अद्याप छदामही कल्याण-डोंबिवलीला मिळाला नाही़ केवळ खोटी आश्वासने द्यायची, स्वप्ने दाखवायची अन् सत्ता मिळवायची, असा कार्यक्रम भाजपकडून राबविला जात आहे, असा आरोप वाघमारे यांनी केला.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस