शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीम विद्यापीठाची अधिसभा बैठक ऑफलाईन- ऑनलाईनच्या वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:49 IST

स्वारातीम विद्यापीठाच्या अधिसभा बैठक ४ डिसेंबर रोजी होणार असल्याचे पत्र अधिसभा सदस्यांना देण्यात आले होते. परंतु २ डिसेंबर ...

स्वारातीम विद्यापीठाच्या अधिसभा बैठक ४ डिसेंबर रोजी होणार असल्याचे पत्र अधिसभा सदस्यांना देण्यात आले होते. परंतु २ डिसेंबर रोजी अधिसभा ऑनलाईन घेण्याचे कळविले आहे. विद्यापीठातील विविध प्रश्नांवर वादळी चर्चा होईल या भितीने कोविड १९ चे कारण देत ही बैठक ऑनलाईन घेण्यात येत असल्याचा आरोप सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी केला आहे. यासंदर्भात प्रा. दामरे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले असून त्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने अनेक कामात गैरकारभार केल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यापीठाची अधिसभा ज्या सभागृहात घेतली जाते, त्याची आसनक्षमता मोठी आहे. सामाजिक अंतर ठेवून ही बैठक घेता येते. विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा ही महाविद्यालयास्तरावर ऑफलाईन घेतल्या जात आहेत. अशा वेळी अधिसभा बैठक ऑनलाईन का घेतली जात आहे. अधिसभा बैेठकीत विद्यापीठाने आचारसंहिता काळात केलेली पदभरती, शासनाच्या विविध नियमांचे लॅब उभारणीत उल्लंघन, विद्यापीठातील बंधारा बांधणीत तांत्रिक मान्यता न घेता ई टेंडर काढणे, परीक्षेमधील चुकीच्या उत्तरसूची वापरणे, आदी विषयावर चर्चा होणार होती. त्यामुळेच विद्यापीठाने ही बैठक ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.