शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाळू ठेकेदारांना गोपनीय माहिती पुरवणारे जिल्हा खनिकर्म अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:40 IST

जिल्ह्यातील १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेत गोपनीय माहिती खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकाºयानेच वाळू ठेकेदारांना पुरविल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला़

नांदेड : जिल्ह्यातील १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेत गोपनीय माहिती खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकाºयानेच वाळू ठेकेदारांना पुरविल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला़ याप्रकरणी खनिकर्म अधिकारी रणज्योतसिंघ सोखी यांना तडकाफडकी निलंबित करून वाळू घाटांची लिलाव प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे़जिल्ह्यातील १०४ वाळूघाटांच्या ई-निविदा प्रक्रियेला ६ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला होता़ २३ नोव्हेंबर पर्यंत आॅनलाईन ई-निविदा भरण्याची मुदत होती़ २४ नोव्हेंबर रोजी प्राप्त निविदांची तांत्रिक माहिती तपासणी करण्यात आली़ या तांत्रिक तपासणीत जिल्ह्यातील २९ घाटांसाठी ८० निविदाधारकांनी ई-निविदा सादर केल्या होत्या़ या प्रक्रियेत वाळू घाटांसाठी आलेल्या निविदाधारकांची माहिती गोपनीय ठेवण्यात येते़ मात्र ही माहिती काही ठेकेदारांपर्यंत पोहोचल्याची बाब जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना कळाली़ त्यानंतर संपूर्ण खनिकर्म विभागातील कर्मचारी तसेच अधिकाºयांची चौकशी करण्यात आली़ त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली़या सर्व चौकशीत खुद्द जिल्हा खनिकर्म अधिकारी रणज्योतसिंघ निर्मलसिंघ सोखी यांनीच कार्यालयीन ई-मेलवरून गोपनीय माहिती आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केली आणि ती माहिती वाळू ठेकेदारांना पुरवल्याची बाब उघड झाली आहे़ तशी कबुलीही सोखी यांनी दिली आहे़ त्यामुळे त्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी पाटील यांनी काढले आहेत़ त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत़या सर्व प्रकारानंतर १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे़ ही संपूर्ण प्रक्रिया आता नव्याने घेण्याचेही आदेशही देण्यात आले आहेत़ ३० नोव्हेंबरपासून फेरनिविदा प्रक्रिया होणार आहे़दरम्यान, जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून रणज्योतसिंघ सोखी हे १ आॅगस्ट २०१६ रोजी नांदेडमध्ये सरळ सेवेने रूजू झाले होते़ त्यांची पहिलीची नियुक्ती नांदेडमध्ये झाली होती़ नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो़ आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून जिल्ह्यातील वाळूला मागणी असते़