शिवनी येथील संदीप दुधमल शेतावरुन साइकल वर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकल वरून घरी येताना संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली.त्या नंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी दोघांनी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता आरोपींनी संदीप दुधमल च्या घरी जाऊन आई, भाऊ,वडील, चुलता, चुलती, बहीण यांना घरात घुसून मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या अन्य एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खाली पाडण्यात आले.घटनेनंतर गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे फौजफाट्यासह गावात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी दोन्ही बाजूकडील मंडळींना शांततेच आवाहन केले. तसेच फरार असलेल्या इतर आरोपींच्या शोधासाठी पथके पाठविली आहेत.
लोहा तालुक्यात दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST