शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून विकासात भेदभाव अपेक्षित नाही - खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:24 IST

महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे विकासाच्या प्रश्नावर शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणारकाँग्रेसने निवडणुकीत घोषित केलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नांदेड : महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली. विकासाच्या प्रश्नावर आपण लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. 

नांदेडच्या मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत  बुधवारी काँग्रेसच्या शीला भवरे या महापौर पदी तर विनय गिरडे हे उपमहापौर पदी निवडून आले. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ७४ मते घेतली तर भाजपाला ६ मते मिळाली. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. चव्हाण यांनी शहरातील प्रमुख प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यात येईल, असे सांगितले. त्याचवेळी काँग्रेसने निवडणुकीत घोषित केलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इतकेच नव्हे तर आता प्रभागनिहाय समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात कच-याचा प्रश्न गंभीर आहे. गोदावरी नदी प्रदुषणाबाबतही मनपा लक्ष घालणार आहे. त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणा-या सहकार्याबाबत त्यांनी सरकारकडून सकारात्मक भूमिका अपेक्षित असल्याचे सांगितले. निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपआपली भूमिका मांडत असतो. निवडणुकीनंतर मात्र जनतेचा कौल स्वीकारुन विकासासाठी शासनाने सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. विकासाच्या विषयावर भेदभाव केला जाऊ नये. आपण मुख्यमंत्री असताना विकासाच्या विषयात भेदभाव केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.  इतकेच नव्हे तर नांदेडच्या विकास कामासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही  खा. चव्हाण यांनी सांगितले. नांदेड महापालिकेला राज्य सरकारकडून मागील तीन वर्षापासून कोणताही निधी दिला गेला नाही़ उलट महापालिकेचे अनेक प्रकल्प निधीअभावी बंद पडले आहेत़ याबाबत विचारले असता महापालिकेकडून या संदर्भातील अहवाल घेवून चर्चा केली जाईल असेही खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.