शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:12 IST

वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सोमवारपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनागपूर खंडपीठाच्या आदेशाने थांबली होती लिलाव प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सोमवारपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.संपूर्ण राज्यभरात पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करुन वाळू लिलाव प्रक्रिया सुरु असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत संपूर्ण राज्यभरात वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाने ३ जानेवारी २०१८ रोजी स्थगिती दिली होती. त्यानंतर पर्यावरणाची हानी तसेच पर्यावरण व्यवस्थापन योजनांच्या पूर्ततेनंतर वाळू लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्या-ज्या जिल्ह्यांत पर्यावरण रक्षणासंबंधी उपाययोजना करण्यात आल्या तेथे वाळू लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.नांदेडमध्येही पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन समिती आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. २४ जानेवारी रोजी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाळू उपशामुळे होणाºया पर्यावरणीय हानीवर चर्चा करण्यात आली. तसेच उपाययोजनाबाबतही आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या समित्यांच्या बैठकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या २९ घाटांतून जिल्हा प्रशासनाला १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. दुसºया टप्प्यातील ५७ वाळूघाटांची प्रक्रिया नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने थांबविली होती. ३ जानेवारीपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर आता पुढील लिलाव प्रक्रियेत वाळूघाटांचा ई-लिलाव होणे अपेक्षित आहे.जिल्ह्यात वाळू घाटांच्या पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेदरम्यान गुप्त माहिती ठेकेदारांपर्यंत गौणखनिज अधिकाºयांकडूनच पोहोचली होती़ त्यामुळे ती प्रक्रिया रद्द करुन नव्याने लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती़ दुसरीकडे लिलाव प्रक्रिया झाली नसतानाही जिल्ह्यात अनेक घाटांवरून बिनदिक्कतपणे रात्रंदिवस वाळू उपसा सुरूच आहे़ वाळू माफियांवर आळा घालण्यात प्रशासन अपयशीच ठरत आहे़