शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result : नांदेडचा टक्का ४.०५ ने वाढला; पहिल्यांदाच ९९.५४ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 16:16 IST

SSC Result of Nanded : राज्य शासनाने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी मुल्यमापन पद्धतीचा अवलंब करत परीक्षा न घेता निकाल जाहीर केले आहेत. 

ठळक मुद्दे२६ हजार ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्णसर्व्हर हँगमुळे विना परिक्षेचा निकाल पाहणाऱ्यांचा हिरमोड

- भारत दाढेल

नांदेड : जिल्ह्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल ९९.५४ टक्के एवढा लागला असून ४७ हजार ११८ विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

नांदेड जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी गतवर्षात ८५ टक्के एवढा निकाल लागला होता. दरम्यान, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात २६ हजार ४२ विद्यार्थी विशेष  प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत १७ हजार ३८३ तर द्वितीय श्रेणीत १ हजार ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द झाल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी मुल्यमापन पद्धतीचा अवलंब करत परीक्षा न घेता निकाल जाहीर केले आहेत. 

सर्व्हर डाऊन असल्याने हिरमोड पहिल्यांदा परीक्षा न देता हजारो विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, हा निकाल पाहण्यासाठी उत्साहाने नेटकॅफेवर गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा सर्व्हर डाऊन असल्याने हिरमोड झाला आहे. परीक्षा न देता पास झाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर होता. तर काही अभ्यासू विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण आल्याने निराश झाले. दरम्यान, एकाच वेळी निकाल पाहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सर्व्हरवर लोड येवून निकालाचे संकेतस्थळ बंद पडले आहे. बराच वेळ सर्च केल्यानंतर निकाल दाखवत असल्याचे शैक्षणिक सल्लागार गजानन मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालNandedनांदेड