शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बोलाचाच भात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या अनुदानावरील विहिरीबाबत उमरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. या योजनेतून अवघे ३५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देप्रचार, प्रसिद्धीचा अभाव : विहिरीसाठी ३५ शेतकरीच पात्र

बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या अनुदानावरील विहिरीबाबत उमरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. या योजनेतून अवघे ३५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.राज्य शासनाच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन ही शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना राबविली जाते. सिंचनाचे नियोजित उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने ही योजना महत्त्वपूर्ण आहे. मात्र योजनेसाठी घातलेल्या अटी आणि योजनेचा प्रसार, प्रचार योग्य पद्धतीने न झाल्याने ही योजना प्रत्यक्ष कागदावरच असल्याचे उमरीसह अनेक ठिकाणी चित्र आहे.अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील कमीत कमी एक एकर जमीन असणा-या शेतक-यांसाठी ही स्वावलंबन योजना आहे़ विहिरीसाठी २़५ लाख रुपये, वीजजोडणीसाठी १० हजारांपर्यंत शासनातर्फे व विद्युत मोटारीसाठी २५ हजारापर्यंत अनुदान असे योजनेचे स्वरूप आहे़ मागासवर्गातील शेतकरी सुद्धा आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने मेहनत करून उत्पन्न काढू शकतो़ असे असले तरी एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास शासनाच्या जाचक अटीला सामान्य माणूस कंटाळतो़ या योजनेचेही असेच झाल्याने उमरी तालुक्यात सदर योजनेसाठी शेतकºयांचा फारच कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे़ सबंध उमरी तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या २० हजार ३५४ तर अनुसूचित जमाती प्रवर्गाची ९ हजार ४३२ एवढी लोकसंख्या आहे़ दोन्ही मिळून ३० हजारांच्या जवळपास लोकसंख्या असताना त्या प्रमाणात योजनेच्या लाभासाठी शेतकरी पुढे आले नाहीत़ या योजनेसाठी ५२ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले़ कागदपत्रांची अपुरी पूर्तता, त्रुटी आदी कारणांमुळे १७ लोकांचे अर्ज रद्द ठरले तर ३५ अर्ज स्वीकारण्यात आले़ पात्र लाभार्थीमध्ये गोळेगाव, तळेगाव, हस्सा, कावलगुडा बु़, सोमठाणा, बितनाळ, सावरगाव, कळगाव, बोथी, तुराटी, बोळसा खु़, गोरठा, हातणी आदी गावांचा समावेश आहे़ चालू वर्षातील मंजूर ३५ पैकी १५ विहिरींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे़ यातील ४ विहिरींना पाणी लागले असून इतर विहिरींचे खोलवर काम होताच पाणी लागण्याची अपेक्षा आहे़योजनेची माहिती प्रत्येक गावात ग्रा़पं़ मार्फत दिली जाते़ ३१ मार्च २०१८ पर्यंत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरींची सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक असून त्यासाठी पं़स़ कडे निधी उपलब्ध आहे़ योजनेच्या लाभातून शेतक-यांना दुस-यांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही व लाभार्थी सक्षम होणार आहे -शिरीषराव गोरठेकर,सभापती, पं़स़ उमरी़