शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात एसआयटीची स्थापन, नांदेड येथे मदरशात घडली होती घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:30 IST

शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणात तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़ 

नांदेड : शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलील येथे शिक्षण घेणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर मौलानानेच बलात्कार केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणात तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे़ 

चुनाभट्टी येथील मदरशात माजलगाव येथील दोन सख्या बहिणी शिक्षण घेत होत्या़ गेल्या सहा महिन्यांपासून मदरशातील मौलाना साबेर फारुखी याने स्वतःच्या  मोबाईलमध्ये असलेली अश्लील चित्रफित दाखवत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करत होता. या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर सोमवारी रात्री आणखी दोन मुलींनी विनयभंगाच्या तक्रारी दिल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मौलाना साबेर फारुखी फरार झाला आहे.

मौलानाच्या विरोधात वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीच्या प्रमुख सुनिता बोरगांवकर म्हणाल्या, मौलानाच्या विरोधात आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता आहे़ मदरशाची पाहणी करण्यात आली असून सर्व रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले आहे़ तसेच मौलानाच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहे.दरम्यान, आज पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी मदरशाची पाहणी केली़