शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संभ्रमावस्थेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:33 IST

नांदेड : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या प्रमुख पक्षासह अन्य लहान-सहान पक्ष तयारीला लागले असले

अनुराग पोवळे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या प्रमुख पक्षासह अन्य लहान-सहान पक्ष तयारीला लागले असले तरी शिवसेना मात्र अजूनही संभ्रमावस्थेतच आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी पक्षाने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवण्यास प्रारंभ केला आहे. सेनेचे महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र अजूनही ‘वरुन’ कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगत आहेत.१० जुलै रोजी महापालिकेची आरक्षण सोडत झाली. त्यानंतर १४ जुलै पासून काँग्रेसने, १५ जुलै पासून भाजपाने आणि १९ जुलै पासून राष्ट्रवादीने इच्छु्रांची अर्ज मागवले आहेत. या पक्षांच्या बैठकाही सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेनेत मात्र शांतताच आहे. १० जुलै रोजी जिल्हा बँकेपुढे ढोल वाजवा आंदोलन झाल्यानंतर तिथेच नगरसेवकांची बैठक घेतली. ही बैठक लोहा-कंधारचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस आ़ हेमंत पाटील हेही उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी आमच्या जागा सोडून अन्य ठिकाणी युती केल्यास हरकत नाही, असे मत मांडले होते. दक्षिणचे आ़ हेमंत पाटील यांनीही भाजपासोबत युती करण्यास सेना सकारात्मक असल्याचे सांगितले होते. या बैठकीस सेनेचे महानगराध्यक्ष अनुपस्थित होते. सेनेने युती संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असली तरीही भाजपाने मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. सेनेची ही बैठक वगळता निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही घडामोडी सुरू झाल्या नाहीत. उलट सेनेतील ९ ते १० नगरसेवक भाजपाच्या गळाला लागले असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. शिवसेनेसह काँग्रेसचेही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेला निवडणुकीसंदर्भाने अद्याप वरुन कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे महानगराध्यक्ष महेश खोमणे यांनी मात्र सेनेची पूर्ण तयारी असल्याचे सांगितले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी बैठका घेतल्याचेही ते म्हणाले. परंतु या बैठका आरक्षण सोडतीपूर्वी घेतल्या होत्या़