शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:46 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़

ठळक मुद्देशासनाची अधिसूचना : अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर/पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़हदगाव तालुक्यातील वरील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते़ यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधार यांची कामे वेळेवर होत नव्हती़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अर्धापूरलाच होत आहेत. यामुळे अर्धापूर तालुका निर्मितीपासून ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा सुरु ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायतसमोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेऊन सदरील मागणी केली.या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सचिव दिगंबर मोळके, उपाध्यक्ष राजेश बाजगिरे सल्लागार आनंद भंडारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गंगाधरराव पाटील चाभरेकर, माधवराव पाटील चाभरेकर, माजी सभापती दिलीपराव पाटील, नारायण संगेवार, माजी सरपंच संजय मोळके, संजय जाधव, प्रल्हाद काकडे, सरपंच रघुनाथ काकडे, रामेश्वर काकडे, भुजंगराव सीतापराव, अनिल मोळके, बालाजी पन्नासे, विश्वनाथ बिचेवार, बबनराव बोले, कल्याण मोळके, गणपत सोळंके, तारू, माजी सभापती श्रीमती पद्मावती घोरपडे, बंटी राठोड, बालासाहेब देशमुख, सदाशिवराव चाभरेकर, बाबूराव घुमनर, देवराव कांबळे, गोविंद भरकड, प्रकाश लांडगे, रमेश जाधव, शंकर जाधव आदींनी परिश्रम घेतले.---अर्धापूरच्या सीमेवर असलेल्या त्या सात गावाला हदगाव ५५ ते ६० कि़मी़ अंतरावर असल्याने शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते़ त्यामुळे हदगाव तालुक्यातील ही सात गावे अर्धापूरला जोडावे, अशी मागणी होती़ ती पूर्ण झाल्याने आम्हाला आनंद होत आहे - राजेश बाजगिरे,सात गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष

टॅग्स :NandedनांदेडGovernmentसरकार