शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी निलंबित

By admin | Updated: April 1, 2017 03:40 IST

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्यावर पदाचा दुरुपयोग, अनियमितता केल्याचा

नांदेड : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्यावर पदाचा दुरुपयोग, अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्त डॉ़ पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी निलंबित केले़ विशेष म्हणजे, केंद्रे शुक्रवारी सेवानिवृत्त होणार असल्याने निरोप समारंभाची तयारी सुरु असतानाच त्यांच्या निलंबनाचा आदेश धडकला.नांदेड जिल्हा परिषदेचे सीईओ प्रशिक्षणासाठी एक महिन्याच्या रजेवर असताना पद्माकर केंद्रे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे होती़ १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात त्यांनी अनेक प्रकरणांत नियमबाह्य निर्णय व प्रशासकीय स्वरुपाच्या अनियमितता केली, असे निलंबन आदेशात म्हटले आहे. त्यात मानव विकासअंतर्गत ड्युएल डेस्क खरेदीमध्ये नियम बदलून निविदा काढल्या, त्याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली़ त्यामुळे ड्यूएल डेस्कची खरेदी झाली नाही़ शासकीय निधीचा अपहार केलेल्या एम़एम़बंडे, एस़व्हीक़ौसल्ये या ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल न करता पुनर्स्थापना करणे, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाच्या ११ कर्मचाऱ्यांना गैरहेतूने पदोन्नतीने पदस्थापनेचे आदेश दिले़ सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या २१़७६ कोटी निधीच्या वितरणाच्या संबंधात सदोष निधी वाटपाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याचबरोबर योजनेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरुन झालेले संभाषण शासनाची प्रतिमा मलीन करणारे आहे़ लेखणीबंद आंदोलनकेंद्रे यांच्या निलंबनाची माहिती मिळताच निरोप समारंभ रद्द करण्यात आला़ विभागीय आयुक्तांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हा परिषदेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे सतीश कावडे यांनी सांगितले.