कोविड-१९ महामारीमुळे सर्वच शैक्षणिक प्रगती थांबलेली होती. या काळातही प्रा. रेड्डी आणि प्रा. जैन यांनी सर्व प्राध्यापकांसाठी उपयुक्त असे ई-शिक्षणसामग्री तयार केली. त्यापैकी एक ‘लॅटिस थेअरी’ तर दुसरा ‘टेक्नॉलॉजिकल टूल्स फॉर ब्लेंडेड टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन’ हे दोन्हीही प्रकल्प केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थेअरी इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (एनएम ई-आयसीटी) मधील ‘विद्यामित्र’ या पोर्टलवर निवड झाली आहे. यातून जवळपास २० हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या पोर्टलवर देशभरातून ४३ विविध कोर्सेसची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातून प्रथमच अशा कोर्सची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून मुंबई येथील आयआयटी वगळता या विद्यापीठाला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. या प्राध्यापकांच्या प्रेरणेने विद्यापीठातील इतरही प्राध्यापकांनी त्यांचे ई-शिक्षणसामग्री विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलातील उपलब्ध असलेल्या स्टुडिओमध्ये विकसित करावी, असा मनोदय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केला आहे. यशाबद्दल विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, संचालक डॉ. डी.डी. पवार, डॉ. नितीन दारकुंडे आदींनी स्वागत केले.
‘स्वारातीम’ विद्यापीठातील दोन प्राध्यापकांच्या ई-शिक्षणसामग्रीची राष्ट्रीय पोर्टल ‘विद्यामित्र’वर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST