शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST

बालाजी पाटील यांची निवड बाऱ्हाळी - येथील बालाजी पाटील माळेगावे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली ...

बालाजी पाटील यांची निवड

बाऱ्हाळी - येथील बालाजी पाटील माळेगावे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे हणमंत पाटील राजेगोरे यांच्या उपस्थितीत शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्या नेतृत्वाखाली हे नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

मनसेकडून उपक्रम

किनवट - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी तालुकाध्यक्ष नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली येथील संथागार वृद्धाश्रमात अन्नदानासाठी निधी समर्पित करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अनिल इरावार यांच्यासह रोहित भिसे, नागेश मंत्रीवार, प्रसाद भंडारे, गणेश कर्नेवार, इलियास चौधरी, विजय वाघमारे आदी उपस्थित होते.

अनिल जाधव यांना पीएच.डी.

देगलूर - धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. डॉ. अनिल व्यंकटराव जाधव यांना स्वारातीम विद्यापीठाने ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांनी कलेक्शन डेव्हलपमेंट पॉलिसी फॉर इरिसोर्सेस इन द युनिव्हर्सिटी लायब्ररी ऑफ वेस्टर्न इंडिया या विषयावरील शोधनिबंध डॉ.जे.एन. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता.

गारगोटवाडी येथे वृक्षारोपण

भोकर - माझं गाव सुंदर गाव अभियानांतर्गत तालुक्यातील गारगोटवाडी येथे सोमवारी सावली प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार दंडे यांच्यासह बी.आर. पांचाळ, सुरेश बोल्लेवाड, दुर्गादास राठोड, सुदाम टारपे, रोहिदास राठोड, शंकर राठोड आदी उपस्थित होते.

दगडवाडी शिवारात चोरीचा प्रयत्न

हदगाव - तालुक्यातील दगडवाडी शिवारात असलेल्या कॅम्पवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना १२ हजार रुपये किमतीच्या सेंटरिंग प्लेट चोरून नेण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी नितीन यादव यांच्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनवटमध्ये प्रतिसाद

किनवट - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंशत लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनला किनवटमध्ये प्रतिसाद मिळाला. काहीजण मास्क न लावताच बाजारात फिरताना आढळून आले. त्यांच्यावर पोलीस पथकाने कारवाई सुरू केली आहे. तसेच विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

उमरीत लसीकरणाला प्रारंभ

उमरी - उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण, डॉ. आशिष कदम, डॉ. मारोती चंदापुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहनराव देवराये आदींच्या उपस्थितीत या उपक्रमास प्रारंभ झाला. यावेळी नगरसेविका दीपाली मामीडवार यांच्यासह अनेकांनी लस घेतली.

मोफत रेती द्या

मुखेड - तालुक्यात नगरपालिका व पंचायत समितीच्या वतीने घरकुल योजनेची कामे सुरू आहेत. परंतु रेतीचे दर आकाशाला भिडलेले आहेत. त्यामुळे अनेकांना घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता या लाभार्थ्यांना मोफत रेती पुरवठा करून रखडलेल्या घरकुलाच्या कामांना गती द्यावी अशी मागणी ज्ञानेश्वर डोईजड, बालाजी वाडेकर, रंजित जामखेडकर आदींनी केली आहे.

धानोरा येेथे विहिरीचे भूमिपूजन

उमरी - तालुक्यातील धानोरा बुद्रूक येथे शासकीय पाणीपुरवठा विहिरीचे भूमिपूजन भगवानराव सर्जे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुधाकरराव देशमुख, आनंदराव सलगरे, सरपंच इरबाजी टोंपे, उपसरपंच कैलासराव देशमुख, शिवानंद देशमुख, दत्तराम मुंगल, पल्लवी मुंगल आदी उपस्थित होते.

आधार कार्ड कॅम्प

कुंडलवाडी - येथील उर्दू माध्यमिक शाळेमध्ये ऑल इंडिया तन्जीम इन्साफच्या वतीने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. ४० नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. याच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे शहराध्यक्ष माजीद, उपाध्यक्ष एम.एम. शेख यांच्यासह फईम खान, अनिस हानीफ, आफीस समद, सय्यद एजाज, इद्रीस फुजेल आदींनी पुढाकार घेतला.