...तर उद्योग बंद करावे लागतील
पहिल्या लॉकडाऊनमध्ये चार टप्प्यांनंतर जिल्ह्यात बहुतांश उद्योगांना परवानगी दिली होती. आता कुठे व्यवसाय सुरळीत होत आहेत. मात्र, दुसऱ्या लाटेच्या भीतीने नागरिक चिंतित आहेत. लॉकडाऊन झालाच तर उद्योजकांना आपले उद्योग बंदच करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सुरेश राठोड, अध्यक्ष, हॉटेल व्यावसायिक संघटना, नांदेड