शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

शाळांना लाखो रुपयांचे बक्षिस; मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात कोण ठरणार सरस ?

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 13, 2024 17:27 IST

या स्पर्धेत नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

नांदेड  : सर्व शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील शाळांना लाखो रुपयांचे बक्षिस मिळणार असून, यात कोणत्या शाळा सरस ठरणार ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  

सदर अभियान १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.सरळ पोर्टलवरील स्टुडंट पोर्टल ही न्यू टॅब दिली असून, यावर जिल्ह्यातील सर्वच १९९९ शाळांची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.आतापर्यंत एकूण ९११ शाळांनी आपली माहिती १०० टक्के केली आहे. माहिती भरलेल्या शाळांचे ५ जानेवारीपासून सुंदर माझी शाळा केंद्रस्तरीय मूल्यांकन सुरू आहे. या अभियानात विजेत्या ठरलेल्या शाळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

तालुक्यातून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणा-या शाळांना बक्षिसांची रक्कम अनुक्रमे ३ लाख रुपये २ लाख रुपये, १ लाख रुपये आहे.जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक १२ लाख रुपये, द्वितीय ५ लाख रुपये आणि तृतीय क्रमाांक प्राप्त करणा-या शाळांना ३ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.सदर स्पर्धा खासगी अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांचा एक गट व खाजगी अनुदानित शाळांचा एक गट अशी विभागणी केली आहे. यासाठी स्वतंत्र बक्षिसांची घोषणा केली आहे. याशिवाय विभागस्तरावर प्रथम बक्षीस २२ लाख रुपये,द्वितीय ११ लाख रुपये आणि तृतीय बक्षीस ७ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. शाळा, विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा व इतर माध्यमांच्या शाळांसाठी ही स्पर्धा खुली आहे. शाळांना पोर्टलवर माहिती भरण्याची अंतिम मुदत १७ फेब्रुवारी २०२४ आहे. त्याअनुषंगाने शाळांची लगबग सुरू आहे.

असे आहेत निकषनिर्धारित गुण शाळांचे मूल्यांकन सुरू झाले असून,विद्यार्थिकेंदित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यावर एकूण ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर एकूण ४० गुण अशा १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे.

या घटकांचा अंतर्भाव संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता,चांगले आरोग्य राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास अशा अनेक विविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सरळ पोर्टलवरील स्टुडंट पोर्टल ही न्यू टॅब दिली आहे.त्यावर सर्व शाळांनी आपापल्या शाळांची माहिती भरणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाNandedनांदेड