शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘सहस्रकुंडा’तून ७ पर्यटकांना वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:20 IST

सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने सात पर्यटक मध्यभागी अडकले. या सर्वांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला यश आले. 

ठळक मुद्देअचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना मध्यभागातून बाहेर निघणे अवघड झाले.दोरीच्या सहाय्याने सातही पर्यटकांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर  सुखरुप बाहेर काढण्यात आले.

इस्लापूर (जि. नांदेड) : सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने सात पर्यटक मध्यभागी अडकले. या सर्वांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला यश आले. पर्यटकात श्यामराव झिंगू राठोड (७०, रा़राजगड), कांताबाई चव्हाण (४०, रा़बोधडी), जनार्दन गायकवाड (२२, रा़चिखलीकर), संदीप ग्यानबा नरवाडे (राग़ोकुंदा ), रविराम राठोड (२७, रा़चिंचोली), तोतीबाई राठोड  (७०, रा़बोधडी), गोची बळीराम जाधव (रा़मुरली) यांचा समावेश होता. इस्लापूरपासून चार कि़मी़ अंतरावर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून  पर्यटक येत असतात. गुरुवारीही बरेच पर्यटक धबधबा परिसरात होते. यातील ७ जण धबधब्याची धार पाहण्यासाठी मध्यभागी उभे होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना मध्यभागातून बाहेर निघणे अवघड झाले. येथे अडकलेल्या सात पर्यटकांत ५ पुरूष व २  महिलांचा समावेश होता. सातही जण जीव मुठीत घेऊन मदतीची याचना करीत होते. हा प्रकार बाहेर उभ्या पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रथम इस्लापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरिक्षक विक्रम विठूगोने, गोपनीय शाखेचे योगेश कोकणे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सरोदे  आदी घटनास्थळी लगेच पोहोचले. बचाव कार्यासाठी  मदत करणारे भोई, देविदास भटेवाड, दिलीप तुमलवाड, विवेकानंद पाटील, संभाजी झाडे, नामदेव राठोड, अरविंद राठोड, सदिंप काळे, सयाजी टेकलवाड, साईनाथ वासेवाड यांना सोबत घेवून  दोरीच्या सहाय्याने सातही पर्यटकांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.  घटनेची माहिती मिळताच किनवटचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी लोढे इस्लापूरचे स.पोनि रामेश्वर कायंदे या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली़