शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘संघा’ला प्रश्न विचारता, ‘एमआयएम’ला का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:32 IST

आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही?

ठळक मुद्देजयदेव डोळे यांचा सवाल हैदराबाद मुक्तिसंग्रामाची मांडली शौर्यगाथा

नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ना स्वातंत्र्य चळवळीत होता, ना हैदराबाद मुक्तिलढ्यात. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्य चळवळीवेळी तुम्ही कुठे होता? असा प्रश्न विचारला जातो. आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही? असा परखड सवाल ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी उपस्थित केला.हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानींच्या शौर्यगाथा ज्ञात, अज्ञात बलिदान केलेल्या लोकांचा परिचय व्हावा, या हेतूने बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन लातूर यांच्या वतीने शनिवारी रात्री येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ‘मराठवाडा मुक्तिगाथा’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण होते. यावेळी मंचावर आ. डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, डॉ. तसनीम पटेल, माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, सदाशिवराव पाटील, मनोहर गोमारे, डी. आर. पाटील, धनंजय पाटील, दिलीप पाटील, जी. टी. जाधव, शंतनू डोईफोडे आदींची उपस्थिती होती.आजकाल कुठल्याही ऐतिहासिक घटनेचे आपल्या विचारधारेप्रमाणे विकृतीकरण करण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र हैदराबाद मुक्तिलढ्याचा इतिहास अद्यापही विकृत झालेला नाही. कारण या लढ्याचे वारसदार जागरुक आहेत. निजामाविरुद्धचा हैदराबाद मुक्तिसंग्राम हा मराठीसोबतच कानडी आणि तेलगू भाषिक लढा होता. त्यामुळे या लढ्यात निजामाविरोधात विरोधक एकसंघ नव्हते. मात्र त्याही परिस्थितीत लबाड आणि अन्यायकारक कारभार करणाऱ्या निजामाला जनतेने एकत्रित येऊन धडा शिकविला. हा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. त्यामुळेच १५ आॅगस्ट १९४७ ही भारतीय स्वातंत्र्यदिनाची तारीख आपण जशी लक्षात ठेवतो, तशीच १७ सप्टेंबर १९४८ ही हैदराबाद मुक्तिसंग्रामाची तारीखही लक्षात ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.हैदराबाद मुक्तिलढा हा स्वामी रामानंद तीर्थ या संन्याशाचा निजामासारख्या धूर्त राजकारण्यांसोबतचा लढा होता. ज्या निजामाने वंदे मातरम्ला बंदी घातली, मराठी भाषेला बंदी घालत येथील जनतेवर अन्याय-अत्याचार केले. १९४२ पर्यंत माणुसकीच्या हक्कासाठीच आम्ही निजामाविरोधात भांडत होतो. मात्र १९४२ मध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाविरोधात भारत छोडोची घोषणा केली आणि ते पाहूनच मराठवाड्यात हैदराबाद छोडो असा आवाज निजामाविरोधात उमटला. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या एमआयएम या पक्षाने हैदराबाद मुक्ती लढ्याविरोधात काम केले. अशा विचारधारेला आणि पक्षाला मराठवाड्यात स्थान का देता? असा सवालही प्रा. डोळे यांनी केला.तत्पूर्वी डॉ. तसनीम पटेल यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाची गाथा सांगितली. या लढ्यामागे वैचारिक भूमिका असल्याचे सांगत तो लढा केवळ हिंदू अस्मितेचा अथवा मुस्लिम द्वेषाचा नव्हता, तर नाकारलेल्या मानवी स्वातंत्र्याविरुद्धचा होता. सत्तेच्या नशेत धुंद झाल्यानंतर निजाम आणि त्याचा हस्तक कासीम रिझवी यांनी मराठवाड्यातील जनतेवर जे अत्याचार केले त्याला इथल्या जनतेने दिलेले ते प्रत्युत्तर होते, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.१७ सप्टेंबर १९४८ ला रझाकारासोबत अशाच लोकांची घरे जाळली गेली, जे निजामाच्या जुलमी राजवटीला मदत करीत होते. निजाम गेल्यानंतरच मराठवाड्यात शिक्षणाची कवाडे खुली होऊन प्रगतीची दिशा मिळाली. त्यामुळे निजामाने मराठवाड्याला काय दिले? याचाही विचार मुस्लिम समाजाने करायला हवा, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला नांदेड शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.नव्या पिढीने समजून घ्यावा मुक्तिसंग्राम लढाअत्यंत विपरित परिस्थितीत बलाढ्य निजामाशी मराठवाड्याने लढा दिला. हा लढा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वत:चे बलिदान देवून मराठवाडा आणि महाराष्टÑ घडविला. त्यांचे बलिदान व्यर्थ जावू देणार का ? असा सवाल करीत नव्या पिढीपर्यंत हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचा इतिहास पोहोचला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मराठवाडा आणि महाराष्टÑाला गौरवशाली इतिहास असताना मराठवाड्याचे विभाजन करण्याची भाषा कशी काय केली जावू शकते? असा प्रश्न करीत मराठवाड्याचे निश्चित प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण महाराष्ट्रात राहूनच सोडवू. मात्र मराठवाडा तोडण्याची भूमिका कुठल्याही परिस्थितीत निषेधार्हच असल्याचे त्यांनी सांगितले. निजामाच्याच मार्गदर्शनाखाली एमआयएमची स्थापना झाली.ही विषवल्ली छाटण्यासाठी आम्ही कालही लढलो आणि यापुढेही लढत राहू, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ