शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र माळेगावला साडेपाच कोटींचा निधी साडेपाच कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : श्रीक्षेत्र माळेगावच्या विकासासाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : श्रीक्षेत्र माळेगावच्या विकासासाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे आदेश राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. या निधीतून माळेगाव येथील विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी माळेगाव यात्रेत ५ कोटी ५५ लाख ५५५ रुपये देण्याची घोषणा केली होती. हा निधी कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा निधी मिळाला नसल्यामुळे राजकारणही रंगले होते. अखेर माळेगाव यात्रा बहरात असतानाच राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाने माळेगावसाठी ६ कोटी ९५ लाख ३६ हजारांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून माळेगाव येथील पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. यासाठी तत्काळ साडेपाच कोटी रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे आदेशही दिले आहेत. या निधीतून करण्यात येणाºया पायाभूत विकास कामांमध्ये दर्शन मंडप, अन्न क्षेत्रालय, स्वच्छतागृह, प्रवासी निवारा, यात्रा व मंदिर परिसरात सुविधा, गुरांना पाणी पिण्यासाठी हौद, धोबीघाट, पार्कींग सोय, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, यात्रा कमान गेट, वीजपुरवठा, पथदिवे, अग्निशमन यंत्रणा, बोअरवेल, पंपहाऊस विकासकामांचा समावेश आहे.ही कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जी कामे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रस्तावित केली जाणार आहेत त्या कामासाठी सदर देवस्थानाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे. सदर निधीतून होणाºया कामांच्या खर्चाबाबत वेळोवेळी शासनास माहिती सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दरम्यान, या निधीच्या उपलब्धतेपूर्वी राजकीय रंगही देण्यात आला होता. माळेगाव यात्रेच्या जिल्हा परिषदेत झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत काही जि.प. सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला निधी कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचवेळी यात्रेदरम्यान रविवारी झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांनी निधी घोषित करुन न देणे ही बाब उचित नसल्याचे सांगितले होते. तसेच या यात्रा कालावधीत निधी मिळेल का? असा सवाल उपस्थित केला होता. त्याचवेळी लोहा- कंधार मतदार संघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा निधी यात्रेदरम्यान प्राप्त होणार असल्याचे यात्रा नियोजनाच्या जिल्हा परिषदेत आणि माळेगाव यात्रेत झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळेच हा निधी प्राप्त झाल्याचे आ. चिखलीकर यांनी सांगितले.४माळेगाव येथे कुस्तीच्या दंगली घेण्यात आल्या. या दंगलीच्या उद्घाटनप्रसंगी आ. चिखलीकर यांनी कुस्तीगीर हे राज्याची शान आहेत. अनेक पहेलवान माळेगावातून घडले आहेत. पुढच्या माळेगाव यात्रेपर्यंत येथे कुस्तीगिरांसाठी कुस्तीचे स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, लोहा पं.स. सभापती सतीश उमरेकर आदींची उपस्थिती होती.कुस्तीचे स्टेडियम उभारण्याचे प्रयत्न