शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या आर्थिक चाव्यासाठी रस्सीखेच; ‘स्थायी’त प्रवेशासाठी दिग्गजांचे पुन्हा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:47 IST

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ  १ डिसेंबर रोजी संपला आहे.

ठळक मुद्देआगामी सर्वसाधारण सभेत आठ सदस्यांची निवडकोरोना संकटात गेला स्थायी समितीचा  कार्यकाळ

नांदेड : महापालिकेच्या आर्थिक चाव्या असणाऱ्या स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी काँग्रेसमधील दिग्गज पुन्हा एकदा सक्रीय झाले असून स्थायीतील प्रवेशानंतर सभापती पदावर या दिग्गजांचा निशाणा राहणार आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ  १ डिसेंबर रोजी संपला आहे. त्यामध्ये दयानंद वाघमारे, पुजा पवळे, अ. रशीद अ. गणी, फारुख हुसेन, ज्योती कल्याणकर, श्रीनिवास जाधव, राजेश यन्नम आणि करुणा कोकाटे यांचा समावेश आहे.  या सदस्यांच्या कालावधीसह विद्यमान सभापती अमित तेहरा यांचा सभापती पदाचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे सदस्य निवडीनंतर सभापती पदाचीही निवड होणार आहे.   स्थायी समितीचे सदस्यत्व मिळण्यासाठी इच्छुक हे नेत्यांकडे साकडे घालत आहेत. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील ८ सदस्यांची नावे घोषित होणार आहेत. हे सर्व सदस्य काँग्रेसचे राहणारा आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील बंद लिफाफ्यात आपले नाव यावे याबाबत प्रयत्न केले जात आहेत. 

स्थायी समितीत प्रवेश मिळाल्यानंतर सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. सभापती पदासाठी माजी सभापती किशोर स्वामी, प्रशांत तिडके हे इच्छुक आहेत तर विद्यमान सभापती अमितसिंह तेहरा हेही आपल्या कोरोना काळात काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी यासाठी आग्रही आहेत. सदस्य पदासाठी नगरसेविका संगीता डक, महेंद्र पिंपळे, गीतांजली हटकर, कौशल्य पुरी, ज्योती कदम, फरहत सुलताना जहागीरदार, रिहाना बेगम चाँद कुरेशी, सुनंदा पाटील यांची नावे सदस्य पदासाठी पुढे येत आहेत. 

स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची निवड विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे   १ डिसेंबरपूर्वी होणे गरजेचे होते. मात्र सर्वसाधारण सभा झाली नसल्याने ही निवड करता आली नाही. आचारसंहितेचे कारण देत सभा झाली नसली तरीही यापूर्वी आचारसंहिता कालावधीत सदस्य निवडीसाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाल्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र कार्यकाळ संपल्यानंतर सदस्यांची निवड होत आहे. ही उल्लेखनीय बाब आहे. आगामी सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागले आहे. 

कोरोना संकटात गेला स्थायी समितीचा  कार्यकाळ  जानेवारी २०१९ मध्ये सभापतीपदी अमितसिंह तेहरा यांची निवड झाली होती. निवड होताच तत्कालीन आयुक्त लहुराज माळी हे रजेवर गेले. त्यानंतर एप्रिलमध्ये विद्यमान आयुक्त डॉ. सुनील लहाने हे रुजू झाले. मात्र मार्चपासूनच कोरोना संकट सुरू झाल्याने स्थायी समितीला काम करण्यात अनेक अडचणी आल्या. आरोग्य याच विषयाला प्राधान्य दिल्याने इतर संकल्पीत योजना मात्र राबवता आल्या नाहीत. 

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाPoliticsराजकारणNandedनांदेड